खोमनाळ येथील जुगार अड्ड्यावर कारवाई, पाच जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:18 PM2018-09-21T12:18:15+5:302018-09-21T12:28:07+5:30
सोलापूर : खेमनाळ (_ता़ मंगळवेढा) गावातील ढेंम्बरे वस्तीवरील कॅनॉलजवळ मोकळया जागेत सुरू असलेल्या जुगार पोलीसांनी छापा टाकला़ या छाप्यात पोलीसांनी ८४ हजार ७०० रूपयांच्या मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खेमनाळ गावातील ढेंम्बरे वस्तीवरील कॅनॉलजवळ मोकळ्या जागेत रात्री पत्राशेड शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकला.
यावेळी पोलीसांनी रामचंद्र गेना सावजी (रा मंगळवेढा), रोहित सिद्धेश्वर इंगले (रा. खोमनाळे, मंगळवेढा), दत्तात्रय वसंत बीरे, (खोमनाळे), बाळासो सौदागर ढेम्बरे (रा खोमनाळे,मंगळवेढा), प्रभाकर सौदाकर इंगळे (रा, खोमनाळे ता मंगळवेढा) यांना ताब्यात घेतले़ याचवेळी त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, वाहने असा ८४ हजार ७०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणांविरूध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पोनि सुधाकर कोरे, पोसइ ए. एस. तांबे, पोसइ डी. एस. दळवी, पो.कॉ.अमोल पाटील, कोंडीबा मोरे, योगेश येवले, मयूर कदम, रविराज गटकूळ, चालक आनंद डीगे यांच्या टिमने केली़