सोलापूर शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करणार, आयुक्त अविनाश ढाकणे यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:17 PM2018-03-13T12:17:43+5:302018-03-13T12:17:43+5:30

कारवाईत किरकोळ बांधकामांना लक्ष्य केले जात आहे. बडे मासे गळाला कसे लागत नाहीत असा आरोप होत होता. नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरही बांधकाम विभागाकडून कारवाई होत नसल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

Action against illegal construction of Solapur City, clarification by Avinash Dhakane, Commissioner | सोलापूर शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करणार, आयुक्त अविनाश ढाकणे यांचे स्पष्टीकरण

सोलापूर शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करणार, आयुक्त अविनाश ढाकणे यांचे स्पष्टीकरण

Next
ठळक मुद्देमनपातर्फे दोन महिन्यांपासून बेकायदा बांधकामाविरुद्ध मोहीम राबविलीमोहिमेत व कारवाईत सातत्य नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्तमनपाने बेकायदा बांधकामप्रकरणी बजाविलेल्या नोटिसा व केलेल्या कारवाईत मोठा

सोलापूर : बेकायदा बांधकाम करणाºया सर्वांवर कारवाई केली जाईल असे स्पष्टीकरण मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी  पत्रकारांशी बोलताना दिले. 

मनपातर्फे दोन महिन्यांपासून बेकायदा बांधकामाविरुद्ध मोहीम राबविली जात आहे. मोहिमेत व कारवाईत सातत्य नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत होती. मनपाने बेकायदा बांधकामप्रकरणी बजाविलेल्या नोटिसा व केलेल्या कारवाईत मोठा फरक येत असल्याने याबाबत वेगवेगळी चर्चा सुरू होती. कारवाईत किरकोळ बांधकामांना लक्ष्य केले जात आहे.

बडे मासे गळाला कसे लागत नाहीत असा आरोप होत होता. नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरही बांधकाम विभागाकडून कारवाई होत नसल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. बांधकाम विभागाच्या या मोहिमेविषयी लोकमतने गेले तीन दिवस केलेल्या वृत्तांकनाची दखल घेत आयुक्त डॉ. ढाकणे यांनी बेकायदा बांधकामाविरोधी कारवाई आणखी तीव्र करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.  बेकायदा बांधकामाबाबत नागरिकांनीही जागरुक रहावे असे आवाहन आयुक्त डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

नागरिकांनी तक्रारी केल्यावरच बºयाच गोष्टी उघड होतात, असे सांगून आयुक्तांनी बेकायदा बांधकामाबाबत फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला. नोटिसा दिलेल्यांची संख्या मोठी असली तरी नव्या कायद्यान्वये ज्यांची बांधकामे नियमित केली जाऊ शकतात अशांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. पण यासाठी संबंधितांनी अर्ज करून योग्य ती दंडात्मक रक्कम जमा करणे आवश्यक आहे. संधी देऊनही मुदतीत अर्ज न करणाºयांचे बेकायदा बांधकाम कोणत्याही परिस्थितीत पाडून टाकले जाईल असा इशारा आयुक्त डॉ. ढाकणे यांनी दिला. 

Web Title: Action against illegal construction of Solapur City, clarification by Avinash Dhakane, Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.