विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई ; ३५ वाहने केली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:42+5:302021-05-28T04:17:42+5:30
तालुका पोलीस स्टेशन चे सपोनी शिवाजी जायपात्रे यांच्या नेतृत्वाखाली विनामास्कच्या ३८ केसेस करून १९०००, फिजिकल डिस्टन्सिंग पालन ...
तालुका पोलीस स्टेशन चे सपोनी शिवाजी जायपात्रे यांच्या नेतृत्वाखाली विनामास्कच्या ३८ केसेस करून १९०००, फिजिकल डिस्टन्सिंग पालन न करणे केसेस २२०० रुपये विना ई-पास प्रवास करणे १०४ केसेस करून ५२,५०० दंड वसूल केला आहे, तर पाच वाहने जप्त केली आहेत.
तर शहर पोलीस स्टेशन ने पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या नेतृत्वाखाली विनामास्क १०८ केसेस करून ५४,००० रुपये फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे ९० केसेस ९ हजार, कोविड संदर्भातील एम. व्ही.ॲक्ट पालन न करणे २९ केसेस ६,५०० ,विना ई-पास विनाकारण प्रवास करणे १०५ केस ५२,५०० दंड, खासगी बसमधून ५०पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करणे २ केसेस करून २० हजार दंड वसूल केला आहे. तालुका पोलिसांनी ५, तर शहर पोलिसांनी ३० वाहने जप्त केली आहेत.
-----------
फोटो : २७ बार्शी
बार्शी : कुर्डुवाडीरोडवर बायपास चौकात तालुका पोलीस स्टेशनचे शिवाजी जायपात्रे कारवाई करतेवेळेस.
===Photopath===
270521\img-20210525-wa0022.jpg
===Caption===
बार्शी कुर्डुवाडी रोडवर बायपास चौकात तालुका पोलीस स्टेशन चे शिवाजी जायपात्रे कारवाई करत असतानाच फोटो