अजनसोंड येथील बोगस डॉक्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 02:44 PM2018-09-18T14:44:41+5:302018-09-18T14:45:55+5:30

Action on the bogus doctor at Ajnsond | अजनसोंड येथील बोगस डॉक्टरवर कारवाई

अजनसोंड येथील बोगस डॉक्टरवर कारवाई

Next
ठळक मुद्दे- पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- रूग्णालयात प्रमाणपत्र दिसून आले नाही- पंढरपूर तालुक्यात अवैध डॉक्टरांचा सुळसुळाट

पंढरपूर : वैद्यकीय ज्ञान व कायदेशीर पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करून जनतेच्या आरोग्य व जीवितास धोका असलेल्या बोगस डॉक्टरला पोलिस व वैद्यकीय पथकाने रंगेहात पकडले आहे. अजनसोंड (ता पंढरपूर) येथील सुमन कुमार रबिन मंडळ यांच्यावर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आले आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ प्रभाकर बोधले, गटविकास अधिकारी आर. एस घोडके, पी आर जावळे, व्ही आर रणदीवे, एस जी डोके असे सर्व मिळुन पंचायत समिती आॅफीस कामकाज आटपून बोगस डॉक्टरचा शोध घेण्याकरीता निघाले. अजनसोंड (ता. पंढरपूर) येथे आलेवर त्यांना एक बोगस डॉक्टर मिळुन आला. त्या अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या इसमाचे नाव सुमन कुमार रबिन मंडळ असे आढळून आले.

 अजणसोंड येथील सुभाष श्रीरंग चव्हाण यांच्या जागेत वैद्यकीय व्यवसाय मागील तीन वर्षांपासून करत होते.  त्यांच्या त्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र दर्शनी बाजूस लावलेली दिसून आले नाही. यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांची मागणी केली. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबत कोणतीच परवानगी नव्हती त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोनी धनंजय जाधव यांनी सांगितले.

Web Title: Action on the bogus doctor at Ajnsond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.