बार्शीतील हॉटेल, दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:19 AM2021-04-05T04:19:53+5:302021-04-05T04:19:53+5:30
तालुक्यातील तावडी येथील उमेश रमेश वाघमारे यांचे नगरपालिकेसमोर ओजस्वी एंटरप्राईजेस मोबाईल सर्व्हिस सेंटरचे दुकान शनिवारी परवानगी नसताना चालु ठेवले. ...
तालुक्यातील तावडी येथील उमेश रमेश वाघमारे यांचे नगरपालिकेसमोर ओजस्वी एंटरप्राईजेस मोबाईल सर्व्हिस सेंटरचे दुकान शनिवारी परवानगी नसताना चालु ठेवले. तसेच सौंदरे येथील प्रभाकर रामभाऊ चिपडे यांनी हॉटेल चालू ठेवले.
पानगाव येथील महादेव आगतराव मोरे यांनीही त्यांचे हॉटेल चालू ठेवले. मानेगाव येथील यश मोहन ताटे व त्रिंबक सौदागर मुसळे यांनी चहाचे कॅन्टींग चालू ठेवले. त्यामुळे बार्शी उपविभागातील पोलीस ठाणे हद्दीतील वरील व्यावसायीकांनी जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब व साथीचे रोग
प्रतिबंधक अधिनियमचे कलम २, ३, ४ व महा. कोव्हिड विनिमयचे कलम ११ प्रमाणे गुन्हे दाखल
केले आहे.
जिल्हाधिका-यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशांचे पालन न झाल्यास
कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी सांगितले.