अवैध धंद्यावर धाडी, साडेतीन लाखांचा मुद्देमाल नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:58 AM2017-08-16T11:58:48+5:302017-08-16T12:00:37+5:30
सोलापूर दि १६ : पोलीस अधिक्षक विरेश प्रभु यांच्या मागदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीसांनी वडजी येथील सेवातांडा येथील अवैध धंद्यावर धाड टाकून ८२ बॅरेलमध्ये भरलेली १६ हजार ४०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन नष्ट केले़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : पोलीस अधिक्षक विरेश प्रभु यांच्या मागदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीसांनी वडजी येथील सेवातांडा येथील अवैध धंद्यावर धाड टाकून ८२ बॅरेलमध्ये भरलेली १६ हजार ४०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन नष्ट केले़
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी गणेश उत्सव व बकरी ईद सणाच्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे वडजी येथील सेवा तांडाच्या पाठीमागील बाजूला सरकारी ओढ्याचे पश्चिम बाजूस झाडीत हात भटटी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती़ या माहितीच्या आधारे सोलापूर तालुका पोलीसांनी अचानक धाड टाकून ८२ प्लास्टिक बॅरेल मध्ये प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे एकूण १६ हजार ४०० लिटर गुळमिश्रीत रसायन असा एकूण ३ लाख ४४ हजार ४०० रूपयांचा माल नष्ट केला़ याप्रकरणातील आरोपी विकास नुरा पवार (रा.वडजी तांडा) हा पळून गेला आहे़ फरारी इसम विकास नुरा पवार( रा.वडजी तांडा ता. दक्षिण सोलापूर) या विरूद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाणे मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोना साखरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
सदर कारवाई मध्ये पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, १५ पुरूष व ५ महिला पोलीस कर्मचारी, स्ट्रायकिंगचे कर्मचारी यांनी भाग घेतला होता़