सोलापूर शहरात अवैध रिक्षा वाहतुकीवर कारवाई, १७ रिक्षांना ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:53 PM2018-09-15T12:53:59+5:302018-09-15T12:56:14+5:30
सोलापूर : सोलापूर शहरात होत असलेल्या अवैध रिक्षा चालकांवर शनिवारी सकाळी रंगभवन चौकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे पथक व सोलापूर शहर पोलीस वाहतुक शाखेच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली़ या कारवाईत १७ अॅटोरिक्षांसह दुचाकीस्वारांना दंड ठोठावण्यात आला आहे.
ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील विशेष पथक व सोलापूर शहर पोलीस दलातील वाहतुक शाखेकडील सपोनि चौगुले, पोसई चवरे, शवाशा कडील १२ कर्मचारी व आरटीओ पथक हजर होते.
सोलापूर शहरात मागील काही दिवसांपासून अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले होते़ त्यामुळे शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी होत होती़ सातत्याने अवैध धंद्याविरोधात येत असलेल्या तक्रारीवरून वाहतुक शाखा व आरटीओंच्या विशेष पथकाने यावर कारवाई करायला सुरूवात केली़ शनिवारी १७ रिक्षांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती शहर पोलीसांनी दिली.