नरसिंगपुर येथे अवैध वाळू उपसा करणाºया वाहनांवर कारवाई, ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:05 PM2018-09-21T12:05:04+5:302018-09-21T12:06:25+5:30

Action on illegal sand extraction vehicles at Narsingpur, 3 lakhs 50 thousand seized | नरसिंगपुर येथे अवैध वाळू उपसा करणाºया वाहनांवर कारवाई, ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

नरसिंगपुर येथे अवैध वाळू उपसा करणाºया वाहनांवर कारवाई, ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्दे- १ ट्रक वाळुसह ३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त- पोलीस अधिक्षकांच्या विशेष टिमची कारवाई- जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकदारांचे धाबे दणाणले

सोलापूर : पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये टेभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील करमाळा चौक रोडवर  नरसिंगपुर भीमा नदीच्या पाञातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक होत असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली़ या कारवाईत ३ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीसांनी दिली.

ग्रामीण पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टिमने करमाळा चौक रोड येथे नरसिंगपुर भिमा नदीच्या पाञातून चोरून वाळू उपसा करून  वाहतूक करणारे १ वाहन त्यात १ ट्रक वाळु, वाहन असा ३ लाख ४० हजार हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी सचिन केशव जगताप ( रा. निरा नरसिंगपुर) यास ताब्यात घेऊन टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे़ ही कारवाई  पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पोनि़ सुधाकर कोरे, पोसइ ए. एस. तांबे, पोसइ डी. एस. दळवी, पो.कॉ.कोंडीबा मोरे, योगेश येवले, मयूर कदम , रविराज गटकूळ,देशमुख, तळेकर चालक आनंद डीगे, या टिमने केली आहे़

Web Title: Action on illegal sand extraction vehicles at Narsingpur, 3 lakhs 50 thousand seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.