जुनोनी येथील अवैध वाळू वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई, ४७ ब्रास वाळूसह ७ वाहने ताब्यात, ६ आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल, सोलापूर ग्रामीण पोलीसांचा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 05:23 PM2018-01-09T17:23:46+5:302018-01-09T17:24:40+5:30
जुनोनी (ता़ सांगोला) येथील अवैध वाळु वाहतुक करणाºयां गाड्यावर छापा टाकला़ यात ४७ ब्रास वाळुसह ७ वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली़ याप्रकरणी सहा जणांविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीसांनी केली़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : जुनोनी (ता़ सांगोला) येथील अवैध वाळु वाहतुक करणाºयां गाड्यावर छापा टाकला़ यात ४७ ब्रास वाळुसह ७ वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली़ याप्रकरणी सहा जणांविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीसांनी केली़
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतून अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याबाबत माहिती मिळाली होती़ या गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टिमने जुनोनी गावाचे जवळील भारत पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून अवैध रित्या चोरीची वाळू वाहतूक करणारे ७ ट्रक पकडून सदर वाळू बाबत परवाना विचारता यातील ६ ट्रक वाल्यानकडे कोणताही परवाना नसलेने ६ ट्रक व त्यांचे चालक बाळू दगडू दुधाळ (रा तळसंगी ता मंगळवेढा), दिलीप सुधाकर शिंदे, शरद लक्ष्मण केदार दोघे रा खरवटेवाडी ता सांगोला, प्रकाश आप्पा करंडे (रा गौडवाडी ता सांगोला), वजीर तजोमुल शेख (रा तळसंगी ता मंगळवेढा),किरण सुरेश नागणे (रा हिवरगाव ता मंगळवेढा) यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरूद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ १ ट्रक यामध्ये एकूण ८ ब्रास वाळू आहे, परंतु त्यांच्याकडे ६ ब्रास वाळूचा परवाना असून उर्वरीत २ ब्रास वाळूचा परवाना नाही़
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील सपोनि संदीप धांडे, पोसई गणेश निंबाळकर, पोहेकॉ मनोहर माने, अंकुश मोरे, पो.कॉ अनुप दळवी, सागर ढोरे पाटील,अभिजीत ठाणेकर, बाळराजे घाडगे, अमोल जाधव, श्रीकांत जवळगे, श्रीकांत बुरजे, अक्षय दळवी, सिध्दाराम स्वामी, पांडूरंग केंद्रे, गणेश शिंदे, महादेव लोंढे या टिमने काम केले आहे़