ड्रोनच्या मदतीने पडताळणी करून वाळू माफियांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:43 AM2021-02-28T04:43:33+5:302021-02-28T04:43:33+5:30
गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी चंद्रभागा नदीपात्रातील सांगोला पाणीपुरवठा केंद्र, जॅकवेल, जुना अकलूज रोड, इसबावी येथे आधुनिक तंत्राचा ड्रोन कॅमेऱ्याचा ...
गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी चंद्रभागा नदीपात्रातील सांगोला पाणीपुरवठा केंद्र, जॅकवेल, जुना अकलूज रोड, इसबावी येथे आधुनिक तंत्राचा ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून जॅकवेल येथे वाळू चोरी चालू असल्याची खात्री केली.
त्यानंतर प्रत्यक्ष वाळू चोरी होत असलेल्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. या कारवाईत १२ लाख ४० हजार रुपये किमतीचे दोन मिनी टेम्पो, १० हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू, ५ आणि २ असे सात हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल, दोन हजार रुपये किमतीच्या वाळू भरण्याच्या पाट्या, खोऱ्या आदी साहित्य, भीमा नदीतून चोरून
सुमारे २० ब्रास वाळूचा अंदाजे एक लाख रुपये किमतीचा साठा असा एकूण १३
लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा मुद्देमाल येथील शहर
पोलीस ठाण्यात आणून गौण खनिज कायद्यानुसार योगेश शिंदे, दीपक भांगे, रोहित
शिंदे, अजिनाथ शिंदे, लखन कांबळे व इतर ४ अशा एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.