सोलापूर शहरातीतल बेकायदा बांधकामावर दुसºयांदा हातोडा, रेल्वे लाईन येथील कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:26 PM2018-01-24T12:26:35+5:302018-01-24T12:27:27+5:30
मनपाने शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात उघडलेल्या मोहिमेत पाडकाम करूनही पुन्हा बांधकाम बस्तान बसविणाºयावर मंगळवारी कारवाई करण्यात आली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २४ : मनपाने शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात उघडलेल्या मोहिमेत पाडकाम करूनही पुन्हा बांधकाम बस्तान बसविणाºयावर मंगळवारी कारवाई करण्यात आली.
मनपाच्या पथकाने रेल्वे लाईन येथील दंडवते मठाशेजारी असलेल्या प्रीतम शहा यांच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेले बेकायदा बांधकाम मंगळवारी पाडण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वीच्या मोहिमेत हे बांधकाम पाडण्यात आले होते. त्यांनी पुन्हा बांधकाम करून पार्किंगच्या जागेत स्टोअर म्हणून वापर सुरू केला होता. त्यांच्याकडे आहार पुरविण्याचा ठेका असल्याने पार्किंगच्या जागेचा वापर या साहित्यासाठी करण्यात येत असल्याचे दिसून आल्यावर मनपाच्या पथकातर्फे दुसºयांदा कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांच्याकडून पाडकाम खर्च व दंड वसूल केला जाणार असल्याचे बांधकाम विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले.
बाळे येथील नंदिनी मल्टिकॉन्स अपार्टमेंटमध्ये बेकायदा बांधकाम करण्यात आल्याची नोटीस यापूर्वीच जागामालक समाने यांना नोटीस बजावली होती. त्यांनी पार्किंगच्या जागेत चक्क ९ गाळे बांधल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गाळ्यांचे पाडकाम करून पार्किंग मोकळे करावे, असे नोटिसीत म्हटले होते. तरीपण त्यांनी दखल न घेतल्याने मंगळवारी सकाळी बांधकाम खात्याचे पथक पाडकामासाठी अपार्टमेंटमध्ये पोहचले. त्यावेळी जागा मालकाने बांधकाम काढण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली. मनपा अधिकाºयांनी त्यांना दोन दिवसांची मुदत दिली आहे. सोमवारी जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनीत कारवाई करण्यात आली होती. यात काही जणांनी पाडकाम स्वत:हून काढण्यासाठी मुदत मागून घेतली आहे. दोन दिवसांनंतर या भागाची पुन्हा तपासणी करून कारवाई करण्यात येणार आहे.
--------------------------
आॅनलाईन प्रतिसाद
- अनधिकृत बांधकामाविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत आतापर्यंत ३४६ मिळकतदारांना नोटिसा दिल्या आहेत. त्यात २९४ व्यावसायिक, ५२ मंगल कार्यालयांचा समावेश आहे. मनपाने २९ ठिकाणचे बांधकाम पाडले आहे तर ४८ जणांनी स्वत:हून पाडकाम केले आहे. मनपाने पाडकाम केलेल्या २६ जणांना १ लाख ९२ हजार पाडकाम खर्च भरण्याची नोटीस दिली आहे. बांधकाम परवाना काढण्यासाठी सुरू केलेल्या आॅनलाईन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ११५ प्रकरणे दाखल झाली आहेत, अशी माहिती परवाना विभाग प्रमुख उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी दिली.