coronavirus; ‘ते’ पत्र व्हायरल करणाºयांवर होणार कारवाई; जिल्हाधिकाºयांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 02:50 PM2020-03-18T14:50:34+5:302020-03-18T14:55:15+5:30
मोहोळ परिसरात सोशल मिडियावरील अफवेची दखल; कल्याण डोंबविली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पत्र व्हायरल
सोलापूर : मोहोळ परिसरात सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिला आहे.
कल्याण — डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पाठविलेले पत्र सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आले आहे. वास्तविक त्या महापालिकेने जिल्हा प्रशासनाला जागरूक राहण्याबाबत कळविले होते. त्यानुसार प्रशासनाने सर्व ती चौकशी करून खबरदारी घेतलेली आहे. संबंधीत व्यक्तीचा संपर्क आलेल्यांचा शोध घेऊन खातरजमा केल्यानंतर कोणताही धोका नसल्याचे निषन्न झाले आहे व ही बाब पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे. असे असताना जुने पत्र सोशल मिडियावर पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करणाºयांचा शोध घेतला जाईल असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी म्हटले आहे.
याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या पोस्टमध्ये काहीही तथ्य नाही. नागरिकांनी अशी पोस्ट व्हायरल करू नये अन्यथा पोलीस कारवाईच्या कचाट्यात सापडाल अशा इशारा देण्यात आला आहे.
------------------
कामती परिसरात सोशल मिडियावर कल्याण डोंबविली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पत्र व्हायरल झाले आहे. कोरोना साथीबाबत लोकांना अजून पुरेशी माहिती नसल्याने अशा चुकीच्या गोष्टींमुळे चचेंला उधाण येत आहे. याबाबत जनजागृती सुरू आहे. सोशल मिडीयावर येणाºया चुकीच्या पोस्टबद्दल नागरिकांनी खातरजमा करावी. अफवा पसरविणाºयांविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
-किरण उंदरे, सहायक पोलीस निरीक्षक,कामती पोलीस ठाणे