मंगळवेढ्यात पाच व्यापाऱ्यांसह १२९ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:06+5:302021-05-21T04:23:06+5:30
मंगळवेढा : कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीतीतील पाच आडत व्यापारी आणि १२९ नागरिकांवर कारवाई ...
मंगळवेढा : कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीतीतील पाच आडत व्यापारी आणि १२९ नागरिकांवर कारवाई केली. तसेच विनामास्कप्रकरणी ६८ लोकांवर कारवाई करीत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या कारवाईत लाखाचा दंड वसूल केला आहे.
मारुती हरी काळे (कासेगाव, ता. पंढरपूर), ओंकार विश्वास भोसले (रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर), सोमनाथ राजाराम बनसोडे (रा. देगाव, ता. मंगळवेढा), बिलाल शेखलाल बागवान (रा. मंगळवेढा), अण्णासाहेब एकनाथ बोदाडे (रा. मंगळवेढा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आडत व्यापाऱ्यांनी आपल्या गाळ्यात विनामास्क गर्दी जमवून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेश मोडला. तपास पोलीस तुकाराम कोळी हे करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
--
विनामास्क फिरणाऱ्यांकडून ३४ हजारांचा दंड वसूल
विनामास्क फिरणाऱ्या ६८ नागरिकांवर केसेस करून ३४ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तीन जणांवर कारवाई करून वाहने जप्त केली आहेत.
निर्धारित वेळेनंतर आस्थापना सुरू ठेवलेल्या दोघांकडून २ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकलेल्या ४९ जणांकडून ९८०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्या १० जणांवर कारवाई करून १ हजार रुपये दंड वसूल केला आहे.