पंढरपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८ हॉटेलवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:38+5:302021-03-27T04:23:38+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदी कोरोनाविषयक निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांची पथके ...

Action taken against 8 hotels in Pandharpur to prevent outbreak of corona | पंढरपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८ हॉटेलवर कारवाई

पंढरपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ८ हॉटेलवर कारवाई

Next

जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदी कोरोनाविषयक निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. रात्री आठनंतर सुरू असलेल्या आस्थापना, हॉटेल, लॉज, बीअर बार यांच्यावर अचानक धाड टाकण्याचे काम पथकामार्फत करण्यात येत आहे.

या पथकाने पंढरपूर शहरातील सहारा परमिट रूम, दोस्ती ढाबा, तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी टाकळी बायपास रोडवरील मेजर कॉर्नर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाखरी येथील गावरान तडका या हॉटेलला अचानक भेट दिली.

यावेळी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून आले नाही. त्या ठिकाणी स्क्रीनिंग मशीन व सॅनिटायझर उपलब्धही नव्हते.

रात्री ८ नंतर फक्त होम पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश असूनही या हॉटेलमध्ये ग्राहक दिसून आले. संबंधित हॉटेलने ग्राहक धोरणविषयक नियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याने गुन्हे दाखल करून हॉटेल सील करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी २ हजार रुपये दंड करण्यात आला आहे.

Web Title: Action taken against 8 hotels in Pandharpur to prevent outbreak of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.