जबरी चोरी करणाऱ्या नितीन भोसलेवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई

By संताजी शिंदे | Published: May 17, 2024 12:22 PM2024-05-17T12:22:04+5:302024-05-17T12:22:47+5:30

मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक, खंडणी मागणे, जबरी चोरी, ईच्छापूर्वक शस्त्रानीशी दुखापत करणे, शस्त्रानीशी धमकी देणे आदी गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे शहरात दाखल आहेत.

Action under 'MPDA' against Nitin Bhosle who committed forced theft solapur crime news | जबरी चोरी करणाऱ्या नितीन भोसलेवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई

जबरी चोरी करणाऱ्या नितीन भोसलेवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई

सोलापूर : शहरातील जोडभावी पेठ, जेलरोड व फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार, नितीन विठ्ठल भोसले (वय २८ रा. रविवार पेठ, जोशी गल्ली सोलापूर) याच्यावर शहर पोलिस आयुक्तालयाने 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई केली.

मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर दगडफेक, खंडणी मागणे, जबरी चोरी, ईच्छापूर्वक शस्त्रानीशी दुखापत करणे, शस्त्रानीशी धमकी देणे आदी गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे शहरात दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. नितीन विठ्ठल भोसले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमद्ये दहशत असून, त्याच्या विरूद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत.

नितीन भोसले याला गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एमपीडीए अधिनियम १९८१ चे कलम ३ अन्वये कारवाई केली आहे. त्याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक तोरडमल, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विशेंद्रसिंग बायस, हवालदार विनायक संगमवार, सुदीप शिंदे, पोलिस शिपाई अक्षय जाधव, विशाल नवले यांनी पार पाडली.

Web Title: Action under 'MPDA' against Nitin Bhosle who committed forced theft solapur crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.