एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई होणार, सहकारमंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:20 PM2018-08-13T13:20:36+5:302018-08-13T13:26:23+5:30

५ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांची थकबाकी अदा करा

Action will be taken against sugar factories on FRP-tired, Co-Chairman's warning | एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई होणार, सहकारमंत्र्यांचा इशारा

एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई होणार, सहकारमंत्र्यांचा इशारा

Next
ठळक मुद्देशेतकºयांच्या ऊस खरेदीपोटी थकीत असलेली रक्कम येत्या पाच सप्टेंबरपर्यंत अदा करावीऊस उत्पादकांची कारखानदारांकडे थकबाकी असल्याच्या अनेक तक्रारीसाखरेचे दर आणि कारखानदारांकडे विक्रीअभावी पैसा थकलेला

 

सोलापूर : साखर कारखानदारांनी शेतकºयांच्या ऊस खरेदीपोटी थकीत असलेली रक्कम येत्या पाच सप्टेंबरपर्यंत अदा करावी. सूचना देऊनही एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सहकारमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेतून दिला.

सहकारमंत्री म्हणाले, ऊस उत्पादकांची कारखानदारांकडे थकबाकी असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संदर्भात कारखानदारांना वारंवार सूचनाही देण्यात आल्या आहेत. ही रक्कम अदा करण्यासाठी कारखानदारांना अडचण असेल तर त्यांनी बफर स्टॉकवर कर्ज घेतल्यास त्याच्या पुनर्गठनाचाही पर्याय ठेवला आहे. हे लक्षात घेता पाच सप्टेंबरच्या आत माझ्यासह सर्वांनी शेतकºयांची बिले द्यावीत, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. साखरेचे दर आणि कारखानदारांकडे विक्रीअभावी पैसा थकलेला आहे, याची जाण सरकारला आहे. हा व्यवसाय ठप्प पडू देणार नाही, यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

ऊस गाळप हंगाम येत्या एक आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. विक्रीसाठी कारखान्यावर येणाºया उसाच्या वजनामध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले जाईल. यात वजनमापे कार्यालयातील अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी, शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी आदींचा समावेश असेल. वजनकाट्यात अनियमितता आढळल्यास या पथकाच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. उसाच्या शेतीसाठी जलयुक्त शिवार योजना फायदेशीर आहे. मुख्यमंत्र्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यातून शेतकºयांच्या जीवनात क्रांती होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

सोलापूरचे ब्रँडिंग महाराष्टÑभर करणार
- सोलापूरचे ब्रँडिंग महाराष्टÑभर करणार असल्याचा मनोदय सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने १६ ते १८ सप्टेंबर या काळात पुण्यामध्ये तीन दिवसीय सोलापूर महोत्सव घेतला जाणार आहे. त्यानंतर नागपूर आणि इचलकरंजीतही असा महोत्सव घेण्याचे नियोजन आहे. 

Web Title: Action will be taken against sugar factories on FRP-tired, Co-Chairman's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.