एफआरपी न देणाºयांवर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर लवकरच होणार कारवाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:50 PM2018-12-08T12:50:17+5:302018-12-08T12:53:34+5:30
सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना ...
सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना देणार असल्याचे पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार एकरकमी एफआरपी देण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी २२ नोव्हेंबर रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत पुणे प्रादेशिक सहसंचालक डॉ. संजय भोसले यांच्यासमोरच एकरकमी एफआरपी देण्यात येईल, असे पत्र देण्याच्या सूचना साखर कारखान्यांना दिल्या होत्या.
लोकमंगल कारखाना वगळता कोणीही असे पत्र दिले नाही. अशाप्रकारचे पत्र जिल्हाधिकाºयांकडे देण्याबाबत कसलाही कायदा नसल्याचे साखर कारखानदारांचे मत आहे. जे कायद्यात नाही ते आम्ही लेखी देण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका घेणाºया कारखान्यांनी एफआरपी धोरणानुसार शेतकºयांना उसाचे पैसेही दिले नाहीत.
जिल्ह्यात सध्या ३१ साखर कारखाने सुरू असून, जयहिंद साखर कारखान्याने प्रति टन २२०० रुपयांनी शेतकºयांना पैसे दिले असले तरी त्याची माहिती प्रादेशिक कार्यालयाकडे नाही.
पांडुरंग श्रीपूर, सासवड माळी शुगर व विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर या साखर कारखान्यांनी २१०० रुपयांनी शेतकºयांना पैसे दिले आहेत. दोन दिवसांखाली झालेल्या कारखान्यांच्या बैठकीत ही माहिती कारखान्यांनी दिली. या तिन्ही साखर कारखान्यांची एफआरपी २४०० ते २५०० रुपये आहे. कारखान्यांनी आजपर्यंत केलेल्या गाळपाची माहिती घेऊन एफआरपी न देणाºया कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना मंगळवारी देणार असल्याचे प्रादेशिक सहसंचालक डॉ. भोसले यांनी सांगितले.
२७ कारखान्यांचे ४६ मेट्रिक टन लाख गाळप
- जिल्ह्यात सुरू असलेल्या सिद्धेश्वर कुमठे, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे या कारखान्यांच्या गाळपाच्या आकडेवारीची नोंद नाही. अन्य २७ साखर कारखान्यांचे ४५ लाख ७७ हजार १०१ मे. टन गाळप झाले तर ४३ लाख ५० हजार ८१५ क्विंटल साखर तयार झाली आहे. चार डिसेंबरच्या साखर आयुक्त कार्यालयाच्या नोंदीनुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूरच्या साखर कारखान्यांचे गाळप सर्वाधिक आहे. अहमदनगर व पुणे हे दोन जिल्हे अनुक्रमे ३२ लाख गाळप करुन दुसºया क्रमांकावर आहेत.
कारखान्याला ऊस आल्यानंतर १४ दिवसात पैसे देण्याचा कायदा असला तरी साखरेला दर नसल्याने पैशाची अडचण आहे. बँकांकडून कर्ज घेऊन पैशाची तरतूद करण्यात येत आहे. एकरकमी एफआरपी द्यावी लागेल.
- महेश देशमुख,
अध्यक्ष, लोकमंगल शुगर बीबीदारफळ
आम्ही कोल्हापूरप्रमाणेच पैसे दिले
- साखरेचा उतारा कमी आहे, उत्पादित साखर विक्री होत नाही, दरही कमी असल्याने आम्ही एफआरपीच्या ८०-८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिल्याचे स्पष्टीकरण विठ्ठलराव शिंदे, पांडुरंग व सासवड माळी शुगर या कारखान्यांनी दिले आहे. कोल्हापूरच्या कारखान्यांनीही अशाच पद्धतीने शेतकºयांना पैसे दिल्याचेही या तीन कारखान्यांनी सांगितले आहे.