बलवडी येथील माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:50+5:302021-07-14T04:25:50+5:30

व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख, तालुका चिटणीस विठ्ठलराव शिंदे, शहर चिटणीस ॲड. भारत ...

Activists including former Sarpanch of Balwadi enter PWD | बलवडी येथील माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

बलवडी येथील माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

Next

व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख, तालुका चिटणीस विठ्ठलराव शिंदे, शहर चिटणीस ॲड. भारत बनकर, सभापती राणी कोळवले, उपसभापती नारायण जगताप, जिल्हा परिषद सदस्य संगीता धांडोरे, ॲड. सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, बाजार समितीचे सभापती गिरीश गंगथडे, सूतगिरणीचे चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पी. डी. जाधव, बाबासाहेब करांडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, संतोष देवकाते, अमोल खरात, दादा जगताप, विष्णू देशमुख, उल्हास धायगुडे, शेकापचे विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, आजी - माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रास्ताविक विठ्ठलराव शिंदे यांनी केले. यावेळी विजय शिंदे, संतोष देवकाते, डॉ. अनिकेत देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी दिली भेट

शेकापचे राज्य चिटणीस आ. जयंत पाटील हे १३ जुलै रोजी सांगोला दौऱ्यावर आले होते. त्यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृतीच्या कारणास्तव व वयोमानानुसार गणपतराव देशमुख घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे ते घरातच विश्रांती घेत आहेत. यावेळी जयंत पाटील यांनी त्यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख यांना त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी विनंती केली. त्यांच्यासमवेत पत्नी सुप्रिया जयंत पाटील, कार्यालयीन चिटणीस राजू कोरडे, राहुल पोकळे, एस. व्ही. जाधव, अमरजित पाटील, बाळासाहेब पाटील, भगवान मालपाणी आदी उपस्थित होते.

फोटो ओळ ::::::::::::::::::::::

शेकापचे राज्य चिटणीस आ. भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बलवडी (ता. सांगोला) येथील शिवसेनेचे नेते विजय शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शे. का. पक्षात प्रवेश केल्याचे छायाचित्र.

Web Title: Activists including former Sarpanch of Balwadi enter PWD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.