आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे : केदार-सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:26 AM2021-08-14T04:26:44+5:302021-08-14T04:26:44+5:30

सांगोला तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात भाजपतर्फे समर्थ बूथ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत लोटेवाडी (ता. सांगोला) येथे बैठक ...

Activists should be ready for the upcoming elections: Kedar-Sawant | आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे : केदार-सावंत

आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे : केदार-सावंत

Next

सांगोला तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात भाजपतर्फे समर्थ बूथ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत लोटेवाडी (ता. सांगोला) येथे बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माढा लोकसभा विस्तारक शरद झेंडे, फलटण तालुका प्रभारी गंगाराम रणदिवे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, दादासाहेब लवटे, शिवाजीराव गायकवाड, विलास व्हनमाने, ओबीसी तालुकाध्यक्ष शिवाजी आलदर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, तालुका उपाध्यक्ष डॉ. विजय बाबर, दत्ता टापरे, सरचिटणीस शिवाजी ठोकळे, मधुकर पवार, भारत धनवडे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष विजय ननवरे, पप्पू पाटील, हणमंत निकम, बाळासोा यादव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी चेतनसिंह केदार-सावंत यांनी आलेगाव, कडलास, वाटंबरे, हातीद, जुनोनी, कोळा, चोपडी, बलवडी, बागलवाडी, लोटेवाडी, खवासपूर या गावात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठक घेत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. बुथरचना, शक्ती केंद्र अधिक मजबूत करण्यावर भर द्या, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

फोटो ओळ ::::::::::::::

लोटेवाडी येथे आयोजित समर्थ बुथ अभियानप्रसंगी मार्गदर्शन करताना दादासाहेब लवटे. यावेळी उपस्थित मान्यवर.

Web Title: Activists should be ready for the upcoming elections: Kedar-Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.