आडम मास्तरांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट अन् केली 'ही' मागणी
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: July 10, 2024 18:54 IST2024-07-10T18:53:38+5:302024-07-10T18:54:10+5:30
आडम यांच्या मागणीबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होईल. त्यानंतर निर्णय घेऊ, असे सुशीलकुमार शिंदे यांनी आडम यांना सांगितल्याची माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी लोकमतला दिली.

आडम मास्तरांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट अन् केली 'ही' मागणी
सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी बुधवारी सायंकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. शिंदे यांच्या जनवात्सल्य बंगाल्यावर दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. महाविकास आघाडीकडून शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा माकपला मिळावी, अशी मागणी आडम यांनी केली आहे. तसे निवेदनही आडम यांनी सुशीलकुमार शिंदे यांना दिले.
आडम यांच्या मागणीबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होईल. त्यानंतर निर्णय घेऊ, असे सुशीलकुमार शिंदे यांनी आडम यांना सांगितल्याची माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी लोकमतला दिली. या वेळी माकपचे महासचिव ॲड. एम. एस. शेख, रे नगर गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी आदी उपस्थित होते.