अक्कलकोटमध्ये ५५ बाधित रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:36 AM2021-05-05T04:36:30+5:302021-05-05T04:36:30+5:30
सध्या शहरीपेक्षा ग्रामीण भाग कोरोना रुग्ण व मृत्यूसंख्येत पुढे असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. सोमवारी दुधनी, नाविदगी ...
सध्या शहरीपेक्षा ग्रामीण भाग कोरोना रुग्ण व मृत्यूसंख्येत पुढे असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. सोमवारी दुधनी, नाविदगी प्रत्येकी २, मैंदर्गी, नागुरे प्रत्येकी ३, दोड्याळ, खानापूर, किणीवाडी, वागदरी, बिंजगेर, बादोला बु., हिळ्ळी, रुद्देवाडी, कोर्सेगाव, सुलेरजवळगे, मिरजगी, मुंडेवाडी, सुलतानपूर, रामपूर, वळसंग, सलगर, कुरनूर, भोसगा या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळला. अक्कलकोट स्टेशन, गळोरगी येथे प्रत्येकी ५, असे ग्रामीण भागात ४४, तर शिवपुरी रोड, विजयनगर, खासबाग, बागवान गल्ली, बॅगेहळ्ळी रोड, उखले गल्ली येथे प्रत्येकी एक, कुंभार गल्ली २, माळी गल्ली ३, असे शहरात ११ रुग्ण आढळले. शहर व तालुक्यात मिळून एकाच दिवसात ५५ रुग्ण आढळून आल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली.