solapur tourism; पक्षी सौंदर्याबरोबरच ‘सैराट’ची स्थळे पाहण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:28 PM2019-01-28T12:28:43+5:302019-01-28T12:32:22+5:30

नासीर कबीर  करमाळा : तालुक्याच्या पश्चिम भागात निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या उजनी लाभक्षेत्रात कृषी पर्यटन विकासाची मोठी संधी सध्या खुणावत ...

In addition to bird beauty, crowds see 'Sairat' place | solapur tourism; पक्षी सौंदर्याबरोबरच ‘सैराट’ची स्थळे पाहण्यासाठी गर्दी

solapur tourism; पक्षी सौंदर्याबरोबरच ‘सैराट’ची स्थळे पाहण्यासाठी गर्दी

Next
ठळक मुद्देउजनी पाणलोट क्षेत्राच्या स्थळावर पर्यटकांना निवासाची व हॉटेलिंगची व्यवस्थापरदेशात जाऊन प्रेक्षणीय स्थळे पाहण्यापेक्षा उजनी धरण लाभक्षेत्रात पर्यटकांना लागणाºया सोयीसुविधा पुरविल्याकरमाळा शहरातील पुरातन किल्ला या स्थळांचे चित्रीकरण झाल्याने राज्यभरातील पर्यटक येथे येऊन आनंद लुटत असतात

नासीर कबीर 

करमाळा : तालुक्याच्या पश्चिम भागात निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या उजनी लाभक्षेत्रात कृषी पर्यटन विकासाची मोठी संधी सध्या खुणावत आहे. धरणग्रस्त शेतकºयांनी प्रयत्न केले तर रोजगारनिर्मिती बरोबरच उजनी लाभक्षेत्र पर्यटकांना हा उत्तम पिकनिक पॉर्इंट ठरू शकतो. पक्षी सौंदर्य आणि ‘सैराट’ चित्रपटातील दिलखेच स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची इकडे सतत गर्दी असते. ही गर्दी व्यावसायिकदृष्ट्या खेचली तर तालुक्यात नवे आर्थिक स्रोतही निर्माण होऊ शकतात.  

पक्षी सौंदर्याबरोबरच ‘सैराट’ची स्थळे पाहण्यासाठी गर्दी
निसर्गसौंदर्य आणि धार्मिक पर्यटनाने नटलेला सोलापूर जिल्हा म्हणजे अवघ्या महाराष्टÑाचं आकर्षण.  पंढरीचा विठुराया आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वर अवघ्या देशभरातील भक्तांनाच ओढीनं खेचणारे!  निसर्गानेही मुक्तहस्ताने या जिल्ह्यावर उधळण केलीय.  धरण अन् प्रकल्पातून एक नवे सौंदर्य सोलापूर जिल्ह्याला लाभले आहे.  राष्टÑीय पर्यटन दिनाच्या निमित्तानं ‘लोकमत’च्या वाचकांसाठी मांडलेला हा लेखाजोखा.

सोलापूर जिल्ह्याच्या टोकाला व अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या करमाळा तालुक्यात पश्चिम सरहद्दीवरून वाहणाºया  भीमा  नदीवर उजनी धरणामुळे करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग सुजलाम्-सुफलाम् बनला आहे. उजनीतील पाण्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेल्या कुगाव, चिखलठाण, वांगी, टाकळी, कोंढारचिंचोली, कात्रज, खातगावचा परिसर पर्यटन केंद्र बनू पाहत आहे. 
करमाळा शहरातील भुईकोट किल्ला, पोथरे येथील शनैश्वर मंदिर, उजनी काठावरील चिखलठाण येथील कोटलिंगाचे मंदिर, हिवरे येथील नागोबा व हिवरे येथील नागनाथाचे मंदिर, सीना नदीकाठावर असलेल्या संगोबाचे आदिनाथ मंदिर अशी प्राचीन धार्मिक स्थळे करमाळा तालुक्यात असून उजनी लाभक्षेत्रात ठिकठिकाणी फ्लेमिंगोसारखे  देशी-विदेशी प्रजातीचे पक्षी अभ्यासक  शिवाय डिकसळचा ब्रिटिशकालीन रेल्वेचा पूल व या परिसराची सुंदरता वाढवित आहे. हे निसर्गसौंदर्य टिपण्यासाठी पर्यटकांचा लोंढा या परिसरात सतत वाहत असतो.

सैराटमुळे उजनी व देवीमंदिर परिसरात गर्दी

  • -  नागराज मंजुळे यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या सैराट चित्रपटाचे चित्रीकरण उजनी धरण परिसरात करमाळा तालुक्यातील कंदर, पोफळज, कुगाव, बिटरगाव-श्री, सांगवी, करमाळा, श्रीदेवीचामाळ  या भागात झाले. कुगाव येथे धरणाच्या पाण्यात बुडालेला इनामदार यांचा वाडा, वांगी येथील पुरातन मंदिराचे अवशेष चित्रपटात चित्रित केले होते. 
  • - करमाळ्यातील श्रीदेवीचामाळ येथील श्रीकमलादेवी मंदिर, शाहन्नव  पायºयांची विहीर, वाळलेले झाड, करमाळा शहरातील पुरातन किल्ला या स्थळांचे चित्रीकरण झाल्याने राज्यभरातील पर्यटक येथे येऊन आनंद लुटत असतात.

पर्यटकांना सोयी-सुविधा व्हाव्यात

  • - निसर्ग सौंदर्याने नटलेल्या करमाळा तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्राच्या स्थळावर पर्यटकांना निवासाची व हॉटेलिंगची व्यवस्था नाही. पर्यटक मोठ्या आनंदाने येत     असले तरी मुक्कामाची कसलीही व्यवस्था नसल्याने मुक्कामी थांबत नाहीत. 
  • -  परदेशात जाऊन प्रेक्षणीय स्थळे पाहण्यापेक्षा उजनी धरण लाभक्षेत्रात पर्यटकांना लागणाºया सोयीसुविधा पुरविल्या तर स्थानिक श्ोतकºयांना पर्यटकांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल, अशी अपेक्षा कुगावचे शेतकरी धुळाभाऊ कोकरे यांनी व्यक्त केली.

Web Title: In addition to bird beauty, crowds see 'Sairat' place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.