कुळाच्या जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्या १४ जणांना अपर तहसीलदारांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:37+5:302021-06-16T04:30:37+5:30

कूळ वहिवाट असलेली १३ हेक्टर ८४ आर शेतजमीन मंद्रुप येथील मळसिद्ध शिवानंद मुगळे आणि मिथुन शिवानंद मुगळे यांनी खरेदी ...

Additional Tehsildar's notice to 14 persons buying and selling clan land | कुळाच्या जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्या १४ जणांना अपर तहसीलदारांची नोटीस

कुळाच्या जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्या १४ जणांना अपर तहसीलदारांची नोटीस

Next

कूळ वहिवाट असलेली १३ हेक्टर ८४ आर शेतजमीन मंद्रुप येथील मळसिद्ध शिवानंद मुगळे आणि मिथुन शिवानंद मुगळे यांनी खरेदी केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यासह गिरीश पाटील, राजेंद्र पाटील, ज्योती पुजारी, सुनीता पाटील, ऋषिकेश पाटील, नेमाजीराव देशमुख, सुभाष टेळे, सुनंदा पुजारी, दत्तात्रेय टेळे, अनिल टेळे, मधुमालती पाटील आदी १४ जणांना अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांनी नोटीस दिली आहे. १८ जून रोजी दुपारी ३ वाजता त्यांना म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.

--------

जमीन कुळाची नाहीच

खरेदी केलेली जमीन कुळाची नाही. १ कोटी ४५ लाखांचा चेक देऊन मी रीतसर खरेदी केली. त्याची नोंद तलाठ्याकडून करून घेतली यात बेकायदेशीर काहीच नाही. अपर तहसीलदारांचा माझ्यावर जुना राग आहे त्यामुळे व्यक्तीद्वेषातून नोंद घेण्यास त्यांचा विरोध होता. माझी बाजू मांडीन.

- मळसिद्ध मुगळे, खरेदीदार, मंद्रुप

----

कूळ वहिवाटीच्या शेतजमिनी खरेदी करण्याच्या अटी आणि शर्ती डावलून व्यवहार झाला आहे. नोंदीला विरोध नाही. मुळात खरेदी-विक्री व्यवहार बेकायदेशीर करण्यात आला आहे. त्याची रीतसर चौकशी करून निर्णय घ्यावा लागेल. मला पुढील कारवाई करायची आहे.

- उज्ज्वला सोरटे , अपर तहसीलदार

मंद्रुप अपर तहसील कार्यालय

----------

रोग एक अन्‌ उपाय भलतेच

मंद्रुपच्या अपर तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी अधिक त्रास दिला जातोय. शेतकऱ्यांचा छळ होत असल्याने मी, रमेश आसबे आणि सुभाष पाटील अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. २० ग्रामपंचायतींनी त्यांच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या. प्रहार आणि किसान सभा या संघटनांनीही या प्रकरणी आवाज उठवला होता. नंतर सगळे शांत झाले पण माझ्यावरचा त्यांचा राग कमी झाला नव्हता, त्यामुळेच मला न विचारता मुगळे यांच्या खरेदीखताची नोंद का घेतली असा त्यांचा आक्षेप आहे. रोग एक आणि उपाय भलताच करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप मळसिद्ध मुगळे यांनी केला आहे.

----

Web Title: Additional Tehsildar's notice to 14 persons buying and selling clan land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.