पंंढरपूर पोटनिवडणुकीची प्रशासनाची तयारी सुरु; प्रांताधिकाऱ्यांनी घेतली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:32 AM2021-02-26T04:32:50+5:302021-02-26T04:32:50+5:30

कोरोनाचे सावट पाहता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका केंद्रावर फक्त एक हजारापर्यंतच मतदान घेता येते. पोटनिवडणुकीसाठी या मतदारसंघात आता ...

Administration begins preparations for Pandharpur by-election; The meeting was held by the prefect | पंंढरपूर पोटनिवडणुकीची प्रशासनाची तयारी सुरु; प्रांताधिकाऱ्यांनी घेतली बैठक

पंंढरपूर पोटनिवडणुकीची प्रशासनाची तयारी सुरु; प्रांताधिकाऱ्यांनी घेतली बैठक

Next

कोरोनाचे सावट पाहता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका केंद्रावर फक्त एक हजारापर्यंतच मतदान घेता येते. पोटनिवडणुकीसाठी या मतदारसंघात आता मतदान केंद्र वाढणार आहेत.

पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते, असे संकेत मिळत आहेत.

दिवंगत आमदार भारत भालके यांचे नोव्हेंबर २०२० मध्ये निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणुकीची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असून याबाबत बैठका होत आहेत.

येथील प्रांत कार्यालयातील सभागृहात प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीस तहसीलदार सुशील बेल्हेकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोगाने १६ सप्टेंबर २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त एक हजार मतदारांचे मतदान घेता येऊ शकते. यामुळे ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीन व मनुष्यबळ त्याच प्रमाणात लागणार आहे. पंढरपूर व मंगळवेढा या दोन तालुक्यात जवळपास दोनशे मतदान केंद्र वाढू शकतात. याबाबतच या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी गुरव यांनी दिली.

Web Title: Administration begins preparations for Pandharpur by-election; The meeting was held by the prefect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.