पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ५२४ मतदान केंद्रे, ३९६५ कर्मचाऱ्यांची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:15 PM2021-03-18T16:15:12+5:302021-03-18T16:16:23+5:30

जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

Administration ready for Pandharpur Assembly by-election; 524 polling stations, appointment of 3965 staff | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ५२४ मतदान केंद्रे, ३९६५ कर्मचाऱ्यांची नेमणूक

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ५२४ मतदान केंद्रे, ३९६५ कर्मचाऱ्यांची नेमणूक

Next

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घोषित केली असून या मतदारसंघात 17 एप्रिल 2021 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून मतदारसंघात मुख्य मतदान केंद्रे 328 आणि सहायक मतदान केंद्रे 196 अशी एकूण 524 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यासाठी 3965 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

            पंढरपूर मतदारसंघ मतदान तयारीविषयीची माहिती पत्रकार परिषदेत श्री. शंभरकर यांनी दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, निवडणुकीची अधिसूचना 23 मार्च, नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 मार्च, नामनिर्देशन पत्राची छाननी 31 मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 3 एप्रिल, मतदानाचा दिनांक 17 एप्रिल, मतमोजणी 2 मे 2021 रोजी होणार आहे.

            पंढरपूर मतदारसंघात पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील गावांचा समावेश होतो. मतदारसंघात एक लाख 77 हजार 387 पुरूष, एक लाख 62 हजार 148 महिला आणि 5 तृतीयपंथी, असे एकूण तीन लाख 39 हजार 540 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 2019 मध्ये या मतदारसंघात दोन लाख 39 हजार 690 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 71.85 टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत 1050 बॉलेट युनिट, 1016 कंट्रोलिंग युनिट, 1009 व्हीव्ही पॅटचा वापर मतदानासाठी होणार आहे. 524 मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी 3150, 60 सेक्टर अधिकारी, विविध पथकातील कर्मचारी 205 आणि 550 पोलीस कर्मचारी अशा एकूण 3965 मनुष्यबळाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

कोविड-19 चे सर्व नियम पाळून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 1210 आरोग्य कर्मचारी/आशा कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार असून प्रत्येक केंद्रावर सॅनिटायझर, तापमान तपासणीसाठी 550 थर्मल गन, 4500 फेस शिल्ड, 4500 हॅन्ड ग्लोज आणि 5000 मास्क यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येणार असून मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन  शंभरकर यांनी केले आहे.

Web Title: Administration ready for Pandharpur Assembly by-election; 524 polling stations, appointment of 3965 staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.