सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन वैद्यकीय अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई; कारण घ्या जाणून

By Appasaheb.patil | Published: October 11, 2023 06:17 PM2023-10-11T18:17:36+5:302023-10-11T18:17:45+5:30

सबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे, वैद्यकीय अधिकारीगोडसे हे विनापरवाना रजेवर असल्याचे दिसून आले.

Administrative action against two medical officers of Solapur Zilla Parishad; Know the reason | सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन वैद्यकीय अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई; कारण घ्या जाणून

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन वैद्यकीय अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई; कारण घ्या जाणून

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन वैद्यकीय अधिकार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिले आहेत. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, तिऱ्हे, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिन्हे, ता. उत्तर सोलापूर येथे भेट दिली. यावेळी सीईंओंनी कर्मचारी / अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची पाहणी केली. परिसर स्वच्छता, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोई सेविधेची पाहणी केली. त्यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. सबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे, वैद्यकीय अधिकारीगोडसे हे विनापरवाना रजेवर असल्याचे दिसून आले.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषध साठा नोंदवही उपलब्ध नव्हती. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी गोडसे व वैद्यकीय अधिकारी राऊतराव यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याबाबतचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Administrative action against two medical officers of Solapur Zilla Parishad; Know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.