नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:31+5:302021-09-25T04:22:31+5:30
कोरोना महामारीनंतर ग्रामीण भागात पाणीटंचाईचा सामना करण्याच्या दृष्टीने या योजना अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. उर्वरित गावांच्या योजनांबाबतही पाठपुरावा केला ...
कोरोना महामारीनंतर ग्रामीण भागात पाणीटंचाईचा सामना करण्याच्या दृष्टीने या योजना अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. उर्वरित गावांच्या योजनांबाबतही पाठपुरावा केला जाणार आहे. योजनेतील १० टक्के लोकसहभागाची अट आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी रद्द केली होती. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे यासाठी सहकार्य लाभल्याचे साठे यांनी सांगितले. यावेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
या गावांच्या योजना मंजूर
माळशिरस तालुक्यातील बाभुळगाव, बागेचीवाडी, बिजवडी, बांगर्डे, धानोरे, हनुमानवाडी, इस्लामपूर, काळमवाडी, कचरेवाडी, खंडाळी, खळवे, कन्हेर, खुडूस, माळखांबी, मारकडवाडी, नेवरे, सदाशिवनगर, सवतगांव, शेंडेचिंच, तरंगफळ, तिरवंडी, तामशिदवाडी, तांबेवाडी, उंबरे-दहिगाव, उंबरे-वेळापूर, विझोरी व उघडेवाडी या २७ गावांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.