माढा तालुक्यातील ८२ गावांवर प्रशासक; जाणून घ्या - कोणत्या गावावर कुणाची केली नियुक्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 08:50 AM2020-11-07T08:50:06+5:302020-11-07T08:50:39+5:30

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावनिहाय केल्या प्रशासकांच्या नियुक्त्या; ग्रामपंचायतच्या निवडणुकी होईपर्यंत गावचा कारभार करणार प्रशासक !

Administrators in 82 villages of Madha taluka; Find out - Who made the appointment in which village | माढा तालुक्यातील ८२ गावांवर प्रशासक; जाणून घ्या - कोणत्या गावावर कुणाची केली नियुक्ती 

माढा तालुक्यातील ८२ गावांवर प्रशासक; जाणून घ्या - कोणत्या गावावर कुणाची केली नियुक्ती 

googlenewsNext

लक्ष्मण कांबळे

कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील नोव्हेंबर -२०२० अखेर ८२ ग्रामपंचायतींची मुदत संपत आली आहे. त्यामुळे पुढील निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा गावकारभार सुरळीत चालण्यासाठी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी तालुक्याच्या ८२ गावांवर प्रशासक म्हणून पंचायत समितीच्या विविध विभागातील विस्ताराधिकारी, कृषी अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका,अभियंते यासारख्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्याबाबाचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

माढा तालुक्यातील नोव्हेंबर- २०२० मध्ये 
मुदत संपणाऱ्या ८२ ग्रामपंचायती आणि
कंसात नव्याने नियुक्त होणारे प्रशासक पुढीलप्रमाणे-

जाधववाडी(मो )- (विलास काळे),कुर्डू ( पी.आर.लोंढे),मोडनिंब(डी. जी. सुतार),बारलोणी-गवळेवाडी(डी.बी. मराठे),उपळाई (बु)(दिगंबर काळे), रुई(संदीप गावडे),अकोले बुद्रुक( बी. टी. रेपाळ),बेंबळे( ए.बी. ढवळे), उंदरगाव(बी.एम.शिंदे),मानेगाव( बी. एम. शिंदे),लऊळ(बी.टी. रेपाळ), अकुलगाव( डी. बी.मराठे),अरण(विलास काळे ),बावी ( सुभाष दाढे), लव्हे( डी.बी. मराठे), उपळाई खुर्द( दिगंबर काळे),अकोले खुर्द(ए.बी.ढवळे),आलेगाव बुद्रुक(संदीप गावडे),मिटकलवाडी( अर्चना खटके) ,अंजनगाव उमाटे ( कापसे), केवड( बी.एम.शिंदे),शिंदेवाडी( योगिता लोखंडे), तांदुळवाडी( खातूनबी आतार),रिधोरे (संभाजी पवार), वरवडे (आशा मगर),महादेववाडी( पी. आर. लोंढे),कुंभेज (डी. जी. सुतार), सापटणे भोसे( योगिता लोखंडे), आलेगाव खु.(संदीप गावडे), नगोर्ली  (ए.बी.ढवळे),माळेगाव (अर्चना खटके),टाकळी (टे).( संदीप गावडे), तांबवे (टे)( लता पाटील), घोटी( बी. टी. रेपाळ),धानोरे( एन. एस. चव्हाण),भुताष्टे( सुभाष लोंढे), वेताळवाडी( योगिता लोखंडे), वडाचीवाडी (तम)( खातुनबी आतार), सोलंकरवाडी (सुभाष दाढे), भोगेवाडी (सविता गडहिरे), ढवळस  (पी.आर.लोंढे),वाकाव( डी. जी.सुतार),गारअकोले (संदीप गावडे), शेवरे(अर्चना खटके), दहिवली( ए. बी. ढवळे),चव्हाणवाडी (टे)( लता पाटील),परिते (बी.टी. रेपाळ), खैराव (एन. एस. चव्हाण), पालवण (उमा साळंके), निमगांव टे( डी.बी. मराठे),चिंचगाव (संभाजी पवार), आकुंभे (उमा साळुंके),व्होळे (खु) (आशा मगर), विठ्ठलवाडी (डी.जी.सुतार),लोंढेवाडी(डी.जी. सुतार, फुटजवळगाव (बी.टी.पोतदार), रांझणी (संदीप गावडे), कापसेवाडी  (एन.एस.चव्हाण),वडाचीवाडी (अंऊ)  (डी.जी.सुतार),उपळवटे (पी.आर. लोंढे),तडवळे (म)(संभाजी पवार), कव्हे (सविता गडहिरे), शिराळ (टे) (ए.बी.ढवळे),परितेवाडी( बी.टी. रेपाळ),सुलतानपूर ( कापसे), बुद्रकवाडी (एन.एस.चव्हाण),  शिराळा (मा) (डी.बी.मराठे),खैरेवाडी ( डी.जी.सुतार),शेडशिंगे (पी.आर. लोंढे),पापनस (संभाजी पवार), रणदिवेवाडी (डी जी सुतार),महातपुर(रतन शिंदे), बैरागवाडी (विलास काळे),सापटणे (टे) (बी.टी.रेपाळ), बिटरगांव( सविता गडहिरे),वडाचीवाडी(ऊबु)( दिगंबर काळे),सुर्ली( ए.बी.ढवळे),जामगां(कापसे),उजनी (मा)(आशा मगर) आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ८२ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंचाचा कालावधी संपला की लगेच संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रशासक म्हणून असणार आहेत.

Web Title: Administrators in 82 villages of Madha taluka; Find out - Who made the appointment in which village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.