कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरच मंदिरातील कार्यक्रमास प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:16 AM2021-07-18T04:16:48+5:302021-07-18T04:16:48+5:30
या महापूजेच्या निमित्ताने मंदिर समिती प्रशासनाची लगबग सुरू आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बाजीराव पडसाळी, विठ्ठल सभामंडप, चौखांबी, सोळखांबी, रुक्मिणी ...
या महापूजेच्या निमित्ताने मंदिर समिती प्रशासनाची लगबग सुरू आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बाजीराव पडसाळी, विठ्ठल सभामंडप, चौखांबी, सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, विठ्ठल व रुक्मिणी मातेचा गाभारा स्वच्छ करण्यात आला.
श्री विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाला व अन्य दोन दरवाजे, गरुड खांबाला चांदी आहे. त्या चांदीचीही स्वच्छता करण्यात आली. यामुळे मंदिरात चांदीची चमक अधिक उठून दिसत आहे. चांदीची स्वच्छता करण्याचे काम पंढरपुरातील सोने व्यापारी अविनाश जवेरी यांनी मोफत करून दिले आहे.
----
दिवसातून चारवेळा सॅनिटायझेशन
आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल सभामंडपामध्ये मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ होतो. यावेळी मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित असतात, म्हणून या कार्यक्रमासाठी मंदिरात विशेष काळजी घेतली जात आहे. दिवसातून चार वेळा सॅनिटायझेशन करणे यासह अन्य कामे सुरू असल्याचे माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
-----
१७पंढरपूर१,२,३
१) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल सभामंडपामध्ये स्वच्छता करताना कर्मचारी.
२) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील चांदीच्या दाराची स्वच्छता करण्यात येत आहे.