संक्रांतीचे वाण म्हणून महिला मंडळाकडून मुलगी शिक्षणासाठी दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:22 AM2021-01-25T04:22:59+5:302021-01-25T04:22:59+5:30
सदर मंडळ सावित्रीबाईंचा वारसा चालवत असल्याचे डॉ. कविता कांबळे यांनी सांगितले. ओम महिला मंडळाच्या अध्यक्षा साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या ...
सदर मंडळ सावित्रीबाईंचा वारसा चालवत असल्याचे डॉ. कविता कांबळे यांनी सांगितले. ओम महिला मंडळाच्या अध्यक्षा साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या अंजली श्रीवास्तव प्रास्ताविकात म्हणाल्या की, आज मुलींना शिक्षणाची खरी गरज आहे; पण आर्थिकदृष्ट्य़ा कमजोर कुटुंबातील हुशार मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन एक सामाजिक बांधिलकी आम्ही जपत आहोत. ओम महिला मंडळाने आजवर ३२ मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. अनुराधा दळवी (जगताप विद्यालय करमाळा. इ. ८ वी) तसेच आकांक्षा संतोष चौधरी (इ. १ ली, शाळा नंबर ४, करमाळा) या दोघींना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
यावेळी सुनीता यादव, दीपा मंडलेचा, मुख्याध्यापिका जयश्री वीर, अलका यादव, बालिका यादव, ज्योती पांढरे, पुष्पा लुंकड, शहनाज मोमीन, निर्मला दळवी, धरी, मंजू राठोड, मितवा श्रीवास्तव, नगमा मोमीन, अनुजा बागमार आदी उपस्थित होते. तिळगूळ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो ओळी :
२३करमाळा
महिला मंडळाच्या वतीने संक्रांतीनिमित्त वाणाचे पैसे जमवून गरीब मुलीस शिक्षणासाठी दत्तक घेताना महिला मंडळ.