विद्यार्थिनींनी रानफूल योजनेतून घडवले प्रौढ साक्षर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:46 PM2019-08-07T12:46:07+5:302019-08-07T12:49:34+5:30
सेवासदन शाळेचा प्रयोगशील उपक्रम : विद्यार्थिनी झाल्या शिक्षिका
सोलापूर : आपल्याला मिळणारे शिक्षण फक्त आपल्यापर्यंत मर्र्यादित न ठेवता ते दुसºयास देण्याचा आनंद सेवासदन शाळेच्या विद्यार्थिनींनी घेतला. शाळेमध्ये राबविल्या जाणाºया रानफूल योजनेतून शहरात राहणाºया प्रौढ अशिक्षित महिलांना या विद्यार्थिनींनी शिक्षणाचे धडे दिले. एकाचवेळी विद्यार्थी व शिक्षिकेची भूमिका या मुली बजावत आहेत.
सेवासदन शाळेतील विद्यार्थिनी मागील १० वर्षांपासून रानफूल हा प्रयोगशील उपक्रम राबवत आहेत. शहरात असणाºया विविध भागात जाऊन विद्यार्थिनींनी प्रौढ शिक्षण वर्ग चालवतात. आठवड्यातील दोन दिवस बुधवार व गुरुवार या दिवशी दोन तास हा उपक्रम घेण्यात येतो. या उपक्रमाचा दुहेरी लाभ होतो. जे प्रौढ शिक्षण घेतात ते साक्षर होतात तर शिकवणाºया विद्यार्थिनींना शिकवावे कसे याचे धडे आपोआप मिळतात. शिक्षक कसा असावा याचे प्राथमिक ज्ञान थेट प्रात्यक्षिकातून मिळते. सोप्या पद्धतीने शिकविण्याच्या पद्धतीही नव्याने विकसित होतात. दरवर्षी उपक्रमाचे ठिकाण बदलण्यात येतात.
विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुस्तक परिचय हा उपक्रम घेण्यात येतो. विद्यार्थिनींनी पुस्तक वाचायला लावून त्याचे परिक्षणही करायला सांगितले जाते. यासोबतच शाळेमध्ये दरवर्षी पुस्तकाचे प्रकाशन केले जाते. यात विद्यार्थिनींनी लिहिलेल्या कथा, कविता यांचा समावेश असतो. वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येते.
शाळेतील सांस्कृतिक विभागामार्फत अनेक प्रकारचे प्र्रशिक्षण दिले जाते. गायन वादन याचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थिनी विविध स्पर्धेत सहभागी होेतात. शिष्यवृत्ती परीक्षा, एमटीएस, एनटीएस या परीक्षेसाठी विशेष तयारी करून घेतली जाते. शाळेमध्ये राबविण्यात येणाºया उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिव केदार केसकर, शालेय समिती अध्यक्ष अॅड. उमेश मराठे, उपमुख्याध्यापक नामदेव राठोड यांचे सहकार्य व मार्गदर्शन असते.
विद्यार्थिनी दत्तक योजना
- विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी शाळेत दत्तक पालक योजना राबविली जाते. प्रत्येक शिक्षक पाच विद्यार्थिनींना दत्तक घेतो. त्यांच्या सर्व प्रकारच्या अडचणी समजावून घेणे, त्यांच्या घरी भेट देणे, अभ्यासातील अडचणी दूर करण्याचे काम शिक्षक करतात. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या अडचणी समजतात त्यावर उपायही काढला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींचा निकालही चांगला लागत आहे.
शिक्षणातून विद्यार्थिनींना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न शाळेकडून केला जातो. संस्कार व मूल्ये रुजविणे हा आमचा उद्देश आहे. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना प्रकाशाची दिशा दाखविण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करणे गरजेचे असते. या दृष्टीने आमची वाटचाल सुरु आहे.
- राजश्री रणपिसे, मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला.