उन्नत शेती,समृध्दी शेतकरी अभियानात जिल्ह्यात २९०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके
By Admin | Published: June 6, 2017 05:19 PM2017-06-06T17:19:16+5:302017-06-06T17:19:16+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि. ०६ :- उत्पादनात दुपटीने वाढ होण्यासाठी राज्य सरकार यंदापासून उन्नत शेती, समृध्द शेतकरी अभियान राबवित आहे. या अभियानातुन उत्पादन वाढीसाठी जिल्ह्यामध्ये खरिपात कृषि विभाग, आत्मा व एमएसीपी प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या पिकांचा २९०० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक उपक्रम राबविला जाणार आहे. उपक्रमात निवड झालेल्या शेतक-यांना खते , बियाणे , किटकनाशके खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये २९७ प्रकल्प असतील.
पिकांचे वैविध्यीकरण करणे , शेतमालाच्या बाजारभावातील नियमित चढ झ्र उतार, शेतक-यांना विक्रीचे तंत्र अवगत करून देणे, शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे, प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पिकांची उत्पादकता वाढविणे उद्देश अभियानाचा आहे.
विविध अवजारे, सूक्ष्म सिंचन संच आणि इतर पायाभुत सुविधांचे अनुदान थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा होईल . या उपक्रमांतर्गत कृषि विभागातर्फे तसेच आत्मा व एमएसीपी प्रकल्पांतर्गत विविध पिकांची प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. जमिन आरोग्य पत्रिकानुसार कोणत्या खताची कमतरता आहे. त्याबाबत कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञ , कृषि विभागाचे अधिकारी आणि संबंधित पिकाची उत्पादकता जास्ती कमी आहे तेथील शेतक-यांशी समन्वय साधून मार्गदर्शन करत आहेत.
गावांत पिकांची उत्पादकता कमी आहे तेथील शेतक-यांची प्रकल्पात निवड केली जाईल. प्रत्येक प्रकल्प दहा हेक्टरचा असेल. निवड झालेल्या शेतक-यांनी खते , बियाणे , किटकनाशके खरेदी केल्यावर त्याबाबतचे अनुदान थेट खात्यावर जमा होईल. कृषी, आत्मा, एमएसीपी खात्यांतर्गत उपक्रमातून शेती उन्नत आणि शेतकरी समृध्द होईल,असा विश्वास प्रकल्प संचालक आत्मा व्हि. एस. बरबडे, व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार यांनी व्यक्त केला आहे.