तब्बल १५ वर्षांनंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाची केली रंगरंगोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:11+5:302021-09-04T04:27:11+5:30
शाळा सुंदर होत असताना कार्यालय कशासाठी मागे ठेवायचे ही प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व तालुक्यातील ...
शाळा सुंदर होत असताना कार्यालय कशासाठी मागे ठेवायचे ही प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व तालुक्यातील शिक्षकांना आवाहन करून लोकवर्गणीतून कार्यालयाची रंगरंगोटी केल्याने या इमारतीला एक वेगळा लूक प्राप्त झाला आहे. या इमारतीच्या खिडक्या, दरवाजे, अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक याचेही काम केले आहे. त्याचबरोबर कार्यालयात भाषण करण्यासाठी डायस, विद्युत उपकरणे, खुर्च्या व पंखेही बसविले आहेत. जवळपास २ लाख ४२ हजार रुपये लोकवर्गणी अधिकारी व कर्मचारी वर्गातून प्राप्त झाली होती. हे सर्व काम आपले घर समजून केल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी कार्यालय परिसरात वृक्षारोपण केल्याने इमारतीच्या सभोवताली झाडी वाढून सौंदर्यात अधिकची भर पडली आहे. भविष्यात या सावलीत शिक्षकांना बसण्यासाठी बाकडे ठेवणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी पी. के. लवटे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील इतर शिक्षण कार्यालयाने मंगळवेढ्याचा आदर्श घेतल्यास निश्चितपणे स्वच्छ व सुंदर होतील, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
फोटो ओळी ::::::::::::::::::::
मंगळवेढ्यातील रंगरंगोटी केलेले हेच ते गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे छायाचित्र.
020921\1011img-20210902-wa0015.jpg
फोटो ओळी -मंगळवेढयातील रंगरंगोटी केलेले हेच ते गटशिक्षणाधिकारी कार्यालय छायाचित्रात दिसत आहे