तब्बल १७ वर्षांनंतर सुलतानपूरची ओळख बनली राहुलनगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:25+5:302021-09-16T04:28:25+5:30
माढा तालुक्यातील सुलतानपूरमधील राहुल शिंदे हे २६/ ११ च्या ताज हॉटेलमधील हल्ल्यात शहीद झाल्यानंतर ग्रामस्थांनी आपल्या गावातील लाडक्या सुपुत्राचा ...
माढा तालुक्यातील सुलतानपूरमधील राहुल शिंदे हे २६/ ११ च्या ताज हॉटेलमधील हल्ल्यात शहीद झाल्यानंतर ग्रामस्थांनी आपल्या गावातील लाडक्या सुपुत्राचा सन्मान करण्यासाठी गावचे नाव राहुल नगर करण्याबाबतचा ठराव दिला होता. नामांतराचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी ग्रामस्थांकडून पाठपुरावा सुरू होता. आमदार बबनराव शिंदे, आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासह अनेक राजकीय नेते मंडळींकडूनदेखील पाठपुरावा सुरू होता. मात्र, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ३ जुलै २०२० रोजी दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासनाने १८ सप्टेंबर २०२० रोजी राजपत्र प्रसिद्ध केले होते. महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन प्रणालीवर राहुल नगर अशी गावाची नोंद दिसू लागल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
..........
माझा मुलगा शहीद झाल्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने युवकांना प्रेरणा मिळावी व देशसेवेसाठी बलिदान दिल्याने सन्मान ठेवण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला होता. मात्र, याला आता न्याय मिळाल्याने आनंद झाला आहे.
-सुभाष शिंदे, वीरपिता,
.................
गावच्या नामांतराचा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र, ग्रामस्थांच्या लढाईला आता यश आल्याने गावची ओळख हे स्वाभिमानाने दिसणार आहे. यामुळे तरुणांना सैन्य भरतीसाठीदेखील प्रेरणा मिळणार आहे.
- रोहनराज धुमाळ, सरपंच राहुलनगर
150921\20210226_103940.jpg~150921\img-20210225-wa0121.jpg~150921\img-20210225-wa0122.jpg
शहीद जवान राहुल शिंदे~वीर पिता सुभाष शिंदे~सरपंच रोहनराज धुमाळ