४८ वर्षांनंतर हालचिंचोळी साठवण तलावाच्या स्वच्छता सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:10+5:302021-05-26T04:23:10+5:30
हालचिंचोळी (ता. अक्कलकोट) येथील हद्दीत १९७२ मध्ये एक मोठा साठवण तलाव बांधण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत या तलावाची ...
हालचिंचोळी (ता. अक्कलकोट) येथील हद्दीत १९७२ मध्ये एक मोठा साठवण तलाव बांधण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत या तलावाची देखभाल दुरुस्ती झाली नव्हती. दीड वर्षापासून सरपंच भीमाबाई बनसोडे यांनी पदाधिकारी व प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. आ. कल्याणशेट्टी यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे २५ मे रोजी प्रत्यक्षात कामास सुरूवात झाली.
याप्रसंगी तहसीलदार अंजली मरोड, उपसरपंच श्रीसैल माशाळे, तंटामुक्त अध्यक्ष शिवगुंडा कोरे, मानव घोडके, किरण सुरवसे, शिवानंद राठोड, सतीश बनसोडे, धनंजय गाढवे, मलकारी बनसोडे, ग्रामसेवक कट्टीमनी आदी उपस्थित होते.
-----
१९७२ मध्ये सोलापूर पाटबंधारे विभागाकडून तलाव बांधण्यात आला. १९९५ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तर १९९८ साली नगर पालिकाकडे हस्तांतरण करण्यात आले. इतकी वर्षे याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सर्वत्र झाडीझुडपे वाढलेली होती, यामुळे अनेक ठिकाणी भेगा पडून तलावाला धोका होण्याची शक्यता होती.
---
दोन वर्षांपासून तलावाच्या स्वच्छता व दुरुस्तीबाबत पाठपुरावा सुरू होता. शेवटी आ. कल्याणशेट्टी याना भेटून तलावाची झालेली अवस्था सांगितली. त्यांनी पाठपुरावा करून प्रत्यक्षात कामाला आज सुरवात झाली. यामुळे पुढचा अनर्थ टळला आहे. माझ्या सरपंचपदाच्या कालावधीत दुरुस्ती, स्वछता होत असल्याने मला समाधान होत आहे.
- सरपंच भीमाबई बनसोडे
---
२५ अक्कलकोट
हालचिंचोळी (ता.अक्कलकोट) तलावाच्या स्वच्छता कामाचे शुभारंभ आ. सचिन कल्यांणशेट्टी हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार अंजली मरोड, सरपंच भीमाबई बनसोडे आदी.