वादग्रस्त कारकिर्दीनंतर डॉ. संजीव ठाकूर पुन्हा सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होणार!
By Appasaheb.patil | Published: June 13, 2024 09:33 AM2024-06-13T09:33:11+5:302024-06-13T09:33:23+5:30
यासंदर्भातील आदेशाचे पत्र राज्याचे उपसचिव अजित सासुलकर यांनी काढले आहेत.
सोलापूर : पुण्यातील ससून रुग्णालयात अधिष्ठाता पदावरील वादग्रस्त कारकिर्दीनंतर डॉ. संजीव ठाकूर आता पुन्हा एकदा सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होणार आहेत. यासंदर्भातील आदेशाचे पत्र राज्याचे उपसचिव अजित सासुलकर यांनी काढले आहेत.
दरम्यान, ससूनमध्ये असताना अमली पदार्थ संबंधित आरोपीला मदत केल्याचे प्रकरण पुढे आले होते. या प्रकरणामुळे डॉ. ठाकूर अडचणीत आले होते. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. सदानंद भिसे प्राध्यापक न्यायवैद्यकशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
डॉ. ठाकूर यांनी कोरोना काळात सोलापुरातील वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी सांभाळली होती. बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (ससून) पुणे येथील अधिष्ठाता पदाचा कार्यभार डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडून १० नोव्हेंबर २०२३ च्या आदेशानुसार काढून घेण्यात आला होता. डॉ. संजीव ठाकूर यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. लवकरच ते सोलापूरचा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.