मोठा प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस
By Appasaheb.patil | Published: June 24, 2023 06:53 PM2023-06-24T18:53:17+5:302023-06-24T18:57:32+5:30
पहिल्याच दिवशी सायंकाळी ५.३० पर्यंत ६६.२ मिमी पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.
सोलापूर : बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरासोबतच जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस पडला. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५.३० पर्यंत ६६.२ मिमी पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारच्या सुमारास आकाशातील ढग दाटून आले होते. दुपारी तीन नंतर शहरात पावसाला सुरुवात झाली. नवी पेठ, चौपाड, जुळे सोलापूर, अशोक चौक परिसर, विजापूर वेस, बाळीवेस, बाळे, देगाव, हैदराबाद रोड आदी शहरातील मुख्य भागात पावसाने हजेरी लावली.
मोठा प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस#solapurrainpic.twitter.com/FNoT1kGjMT
— Lokmat (@lokmat) June 24, 2023
याशिवाय ग्रामीण भागात उत्तर सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, करमाळा, माळशिरस आदी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचले आहे. मंगळवार बाजार परिसरात असलेल्या गणेश शॉपिंग सेंटर भागात कमरे एवढे पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.