‘आदिनाथ’नंतर आता ‘विठ्ठल’वर डोळा ठेवून भगीरथला उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:36+5:302021-04-09T04:23:36+5:30

मंगळवेढ्यात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी आ. प्रशांत परिचारक, आ. सदाभाऊ खोत, समाधान आवताडे, ...

After 'Adinath', Bhagirath's candidature is now keeping an eye on 'Vitthal' | ‘आदिनाथ’नंतर आता ‘विठ्ठल’वर डोळा ठेवून भगीरथला उमेदवारी

‘आदिनाथ’नंतर आता ‘विठ्ठल’वर डोळा ठेवून भगीरथला उमेदवारी

Next

मंगळवेढ्यात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी आ. प्रशांत परिचारक, आ. सदाभाऊ खोत, समाधान आवताडे, बाळासाहेब भेगडे, लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते.

राम शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीला दिवंगत आ. भारत भालके यांच्या कुटुंबात उमेदवारी द्यायची नव्हती, त्यांना पार्थ पवारांना उमेदवार म्हणून पुढे आणायचे होते म्हणूनच शेवटपर्यंत उमेदवार जाहीर केला जात नव्हता. दोन वेळा जयंत पाटील, अजित पवार पंढरपूरमध्ये आले. मात्र, उमेदवार जाहीर न करता जनतेच्या मनातील उमेदवार दिला जाईल, असे सांगून गेले. ते शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येताना भगीरथ भालकेंना उमेदवारी जाहीर केली, असा विलंब तासगाव, पलूस, अशा कोणत्याही पोटनिवडणुकीत झाला नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला.

-----

...अन् ‘विठ्ठल’चे टेंडर काढले जाईल

निवडणुकीनंतर विठ्ठल दिवाळखोरीत काढून त्याचे टेंडर काढले जाईल व ते दुसरे कोणी न भरता तो कारखाना बारामतीला दिला जाईल, असाही आरोप राम शिंदे यांनी केला.

Web Title: After 'Adinath', Bhagirath's candidature is now keeping an eye on 'Vitthal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.