अखेर पवारांनीच २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतला आदिनाथ कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:56 AM2021-01-13T04:56:55+5:302021-01-13T04:56:55+5:30
करमाळा तालुक्यातील शेलगाव-भाळवणी येथील आदिनाथ कारखान्याकडे राज्य शिखर बँकेचे १२५ कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने शिखर बँकेने आदिनाथची सर्व मालमत्ता ...
करमाळा तालुक्यातील शेलगाव-भाळवणी येथील आदिनाथ कारखान्याकडे राज्य शिखर बँकेचे १२५ कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने शिखर बँकेने आदिनाथची सर्व मालमत्ता ताब्यात घेतली. शिवाय आदिनाथकडील कर्ज वसूल करण्यासाठी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेऊन जाहीर निविदा काढली होती. आदिनाथ कारखान्याच्या गुदामात एक लाख साखर पोती शिल्लक आहेत. कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासााठी पहिल्यापासून आमदार पवार उत्सुक होते. त्यानुसार त्यांच्या बारामती अॅग्रोची निविदाप्रक्रिया राज्य बँकेने पूर्ण करून कारखाना बारामती अॅग्रोला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोट ::::::::::::
आदिनाथ कारखाना आर्थिक अडचणीत आल्याने ऊस उत्पादक व कामगारांना न्याय मिळत नव्हता. पवारांना कारखानदारी चालविण्याचा अनुभव असल्याने आदिनाथच्या ऊस उत्पादकांना जास्तीचा भाव मिळेल व कामगारांना योग्य न्याय मिळेल.
- राजेंद्र बारकुंड,
ऊस उत्पादक, चिखलठाण
कोट :::::::::::
आदिनाथ कारखाना बारामती अॅग्रोनेच घ्यावा, अशी तालुक्यातील ऊस उत्पादकांची इच्छा होती. कारखान्याच्या विस्तारीकरण व उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प सुरू करून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून ऊस उत्पादक व कामगार, वाहतूकदार व तोडणी कामगार यांच्या हिताचे निर्णय घेऊ.
- सुभाष गुळवे,
उपाध्यक्ष, बारामती अॅग्रो