प्लास्टिकबंदीनंतर सोलापूरात रद्दीचा वापर अन् मागणीही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:25 PM2018-07-09T12:25:17+5:302018-07-09T12:28:00+5:30

दर स्थिर : प्लास्टिक बंदीनंतर धान्यांसाठी गुळगुळीत पेपर

After the ban, the use and demand of the waste in Solapur increased | प्लास्टिकबंदीनंतर सोलापूरात रद्दीचा वापर अन् मागणीही वाढली

प्लास्टिकबंदीनंतर सोलापूरात रद्दीचा वापर अन् मागणीही वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देघाऊक बाजारात आणि भाजीमंडईतही रद्दी पेपरचापर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने चांगला निर्णयजुन्या आठवणीही जाग्या झाल्या़ निर्णय स्वागतार्ह

काशिनाथ वाघमारे 
सोलापूर : प्लास्टिक बंदीला सोलापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे़ शहरात प्लास्टिकऐवजी रद्दी पेपरचा वापर वाढला आहे़ पूर्वी प्लास्टिकमध्ये दिले जाणारे मटण आणि हवाबंद स्थितीतील दाळीही गुळगुळीत कागदात दिल्या जात आहेत.शासनाच्या निर्णयाचा चांगलाच परिणाम दिसून येतोय़ 

शहरात रद्दी विक्रेत्यांकडे रद्दी पेपरपेक्षा मासिक आणि गुळगुळीत इंग्रजी पेपरची मागणी आणि वापर वाढलेला दिसून येतोय़ मटण व्यवसायावरही याचा परिणाम झालेला दिसून येतोय़ आता गुळगुळीत इंग्रजी पेपरमध्ये काही ठिकाणी मटण दिले जातेय़ अनेक ठिकाणी बाजारपेठेत व्यापाºयांनी पाच हजार रुपयांच्या दंडाच्या भीतीने दुकानातून प्लास्टिक पिशवी काढून टाकली आहे़ दुकानदार कापडी पिशव्या आणि गुळगुळीत पेपरमध्ये वस्तू देत आहेत़ अगदी भाजी मंडईतदेखील उसळ ही गुळगुळीत पेपरमध्ये दिली जात आहे़ त्यामुळे मिलला जाणारा पेपर आणि मराठी रद्दी याचे प्रमाण काहीअंशी कमी झाले आणि त्याचा स्थानिक पातळीवर वापर आणि दुकानदारांकडून विक्री वाढली आहे़ 

दूध पिशव्यांची आवक घटली
प्लास्टिक बंदीचा फटका काहीअंशी रद्दी विक्रेत्यांना झालेला दिसून येतोय़ दूध पिशव्यांचा सर्वाधिक दर होता; मात्र शासनाच्या बंदीनंतर दूध पिशवीचे प्रमाणदेखील कमी झाल्याचे रद्दी विक्रेत्यांनी सांगितले़ या प्लास्टिक बंदीबाबत रद्दी विक्रेत्यांमध्येही काहीअंशी संभ्रमावस्था आहे़ या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे रद्दी विक्रेत्यांनीही स्वागत केले आहे़ 
   
दर तोच
प्लास्टिक बंदीनंतर कापडी पिशव्या आणि रद्दीचा वापर वाढेल आणि त्यांचा दरही वाढेल अशी अपेक्षा होती; मात्र किरकोळ व्यवसाय असल्याने कुठेही दरवाढ दिसून आलेली नाही; मात्र वापर आणि मागणी वाढल्याचे निदर्शनास आले नाही़ मराठी पेपर हा १२ रुपयांनी ग्राहकांकडून घेतला जातो तर वापरासाठी ग्राहकांना तो १५ रुपयांनी विकला जातो़ 


प्लास्टिक बंदीचे स्वागतच करतो आहे़ घरामध्ये आलेले मराठी वर्तमानपत्र वाचून झाल्यानंतर काही बातम्या, लेख कात्रण करतो़ त्यानंतर आठ दिवसात जमा झालेल्या रद्दी पेपरच्या कागदी पिशव्या करुन घरी वापरतो आहे़ ही संकल्पना गल्लीमधील अनेकांना आवडली़ अनेकांनी हाच प्रयोग सुरु केला आहे़ काही विद्यार्थीही कागदी पिशव्या बनवून घरोघरी देत आहेत़         
- नेहा पुल्ला (ग्राहक)

घाऊक बाजारात आणि भाजीमंडईतही रद्दी पेपरचा वापर होत आहे़ हे व्यापारी गल्लीतील अनेकांकडून रद्दी गोळा करून नेत आहेत़ रद्दी दुकानापर्यंत जाऊन विकण्याचा त्रास कमी झाला आहे़ पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने चांगला निर्णय घेतला आहे़ अगदी गूळ आणि कच्ची उसळदेखील कागदाच्या पुड्यात विक ली जात आहे़ यामुळे जुन्या आठवणीही जाग्या झाल्या़ निर्णय स्वागतार्ह आहे.
- श्रीमंत आयवळे (ग्राहक) 

Web Title: After the ban, the use and demand of the waste in Solapur increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.