जिल्हाधिकारी पाठोपाठ आता झेडपीचे सीईओ दिलीप स्वामीही कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 12:33 PM2021-02-24T12:33:44+5:302021-02-24T12:34:10+5:30
सोलापूर : त्रेपन्न वर्षीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना बुधवारी ...
सोलापूर : त्रेपन्न वर्षीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना बुधवारी खाजगी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात पालकमंत्री बैठक घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी रुग्णालयातून पालकमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी उपाययोजना संदर्भात त्यांना माहिती दिली. पालकमंत्र्यांनी यावेळी शंभरकर यांच्या आरोग्याची विचारपूस केली.
जिल्हाधिकारी शंभरकर यांना सोलापुरात रुजू होऊन एक वर्ष झाले आहे. सोलापूरकरांना कोरोना मधून बाहेर काढताना ते दोनदा कोरोना पॉझिटिव्ह झाले. ऑक्टोबर मध्ये ते पहिल्यांदा पॉझिटिव्ह झालेत. डॉक्टरांच्या सूचनेद्वारेनुसार ते पुढील काही दिवस आराम करतील. त्यानंतर पुन्हा नव्या उत्साहाने सोलापूरकरांच्या सेवेत रुजू होणार आहेत.