पतीच्या निधनानंतर घेतला रिक्षाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:56+5:302021-03-08T04:21:56+5:30
वाटेला आलेला १६ वर्षांचा वनवास कथन केला आहे अंबिका अंबादास पानगंटी या विधूर रिक्षा चालक महिलेने. उराशी मोठी स्वप्न ...
वाटेला आलेला १६ वर्षांचा वनवास कथन केला आहे अंबिका अंबादास पानगंटी या विधूर रिक्षा चालक महिलेने.
उराशी मोठी स्वप्न बाळगून ती मजरेवाडीत राघवेंद्र नगरमध्ये काकाच्या सहा बाय दहा खोलीत जगते आहे. माहेरी गरिबीशी सामना सुरु असताना २००१ साली तिचा अंबादास नारायण पानगंटी यांच्याशी विवाह झाला. २००२ साली मुलगी जन्माला आली अन् आनंद झाला. पती वर्षोनवर्षे दुस-यांची रिक्षा चालवून कुटूंबाची गुजरान करीत असताना अल्पशा आजाराने हिरावले. केवळ तीन वर्षांचा संसार चालला. मात्र पदरात चिमुरडीला घेऊन या हिरकणीने मोठी स्वप्नं रंगवली. धुनीभांडी केली, रुग्णांची सुश्रूशा केली. अनेक प्रकारची कामे करुन पतीच्या निधनानंतर १६ वर्षांचा खडतर प्रवास अनुभवला. छोटी-मोठी कामे करत असताना मुलीच्या शिक्षणासाठी बँकत एफडी केली.
अशात नवीन रिक्षा परवाना वितरित करण्याची वृत्तपत्रात बातमी वाचली. रिक्षा धेण्यासाठी बचत गटाकडून काही अर्थसहाय्य घेतले आणि ८८ हजारांची एफडी मोडून नवी रिक्षा आणि परवाना घेतला.
----
मुलगी अन् आई
दोघी एकाचवेळी झाल्या दहावी उत्तीर्ण
लग्नापूर्वी अंबिकाचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. आठवीत शिक्षण घेत असताना गरिबीमुळे पाठ्यपुस्तके घेता आली नाहीत. त्यामुळे शाळेला पाठ फिरवावी लागली. पतीच्या निधनानंतर जिल्हा परिषदेत कार्यालयांमध्ये किमान झाडू मारण्याचे काम मिळेल या आशेेन त्या फिरत राहिल्या. येथील कर्मचारी संघटनेच्या एका पदाधिका-याने काम मिळेल, पण दहावी उत्तीर्ण हवे अशी अट सांगितली. त्या निराशा झाल्या. परंतू प्रयत्न सोडायचा नाही मनाशी गाठ बांधली. १९९७ साली थांबलेल्या शिक्षणानंतर २०१८ साली स्वत:च्या मुलीबरोबर १७ नंबर अर्ज करुन दहावीची परीक्षा दिली अन ६० टक्के गुण घेऊन त्या उत्तीर्ण झाल्या. आता मुलगी बारावी उत्तीर्ण आहे. यमगरवाडीच्या आश्रमशाळेत दहावीपर्यंत शिकलेल्या मुलीला पुढील शिक्षणासाठी हैदराबादमध्ये संधी मिळवून दिली आहे. तिला रेडिओ टेक्नोलॉजिस्ट करण्यासठी धडपड सुरु आहे.