आनंदाची बातमी; पाच महिन्यानंतर नान्नजमध्ये परतला माळढोक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:28 AM2020-03-09T11:28:35+5:302020-03-09T11:30:26+5:30
पर्यावरणप्रेमी आनंदले; आणखीन माडक असण्याची शक्यता
ठळक मुद्देनान्नज येथे आहे माळढोक अभयारण्यकित्येक दिवसापासून या अभयारण्यातील माळढोक झाले होते गायब
सोलापूर : तब्बल पाच महिन्यानंतर नान्नज येथील अभयारण्यात माळढोक दिसला आहे. यामुळे पर्यावरणप्रेमीत आनंदाचे वातावरण आहे.
मागील काही दिवसांपासून माळढोक अभयारण्य परिसरात वावरत आहे. माळढोक ही मादी आहे. येत्या काळात आणखी माळढोक दिसण्याची शक्यता वन परिक्षेत्र अधिकारी कल्याणराव साबळे यांनी व्यक्त केली आहे.
नान्नज, गंगेवाडी, बोरामणी, निलेगाव येथे ही मादी दिसत आहे। मादीचा आकार हा नरापेक्षा कमी असल्याने ती लवकर दिसून येत नाही। सोलापूर जिल्ह्यात गवताळ क्षेत्र राहिल्यास माळढोक वाढू शकतात अशी अपेक्षा पक्षीमित्र भरत छेडा यांनी व्यक्त केली.