कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता तहसिलदार बसले आंदोलनाला

By संताजी शिंदे | Published: April 3, 2023 07:08 PM2023-04-03T19:08:45+5:302023-04-03T19:09:00+5:30

बेमुदत कामबंद : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच मारला ठिय्या

After getting relief to the employees, now Tehsildar sat on the protest! | कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता तहसिलदार बसले आंदोलनाला

कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाल्यानंतर आता तहसिलदार बसले आंदोलनाला

googlenewsNext

संताजी शिंदे

सोलापूर : ग्रेड पे वाढविण्यात यावा या मागणीाठी तहसिलदार, नायब तहसीलदारांच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील संजय गांधी निराधार योजना कार्यालयाजवळ सोमवार पासून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग-२ हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतू नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनी, नायब तहसीलदाराचे ग्रेड पे वाढविण्याबाबत १९९८ पासून मागणी केली जात आहे. संघटनेनी नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग-२ यांचे ग्रेड पे ४८०० रू करण्याच्या अनुषंगाने बेमुदत बंदची नोटीस दिली होती. मात्र महसूल प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.      

तत्कालीन अपर मुख्य सचिव व महसूल मंत्री, वित्तमंत्री यांच्यासह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे अश्वासन दिले होते. कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समिती समक्ष ग्रेड पे संदर्भात सादरीकरण करण्यात आले. मात्र मागणीचा विचार झाला नाही. त्यामुळे बेमुदत आंदोलनाला सुरूवात करण्यात आली आहे. आंदोलनात सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत.

Web Title: After getting relief to the employees, now Tehsildar sat on the protest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.