‘लोकमत’च्या वृत्तानंतर सोलापुरातील शिवाजी चौकाने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 03:27 PM2018-12-07T15:27:41+5:302018-12-07T15:30:30+5:30

वाहतूक शाखेचा चोख बंदोबस्त : रस्त्यावर उभारणाºया रिक्षांना केले बाजूला; एस.टी. बसना वळवले सम्राट चौकमार्गे

After the 'Lokmat' report, Shivaji Chowk took a breather in Solapur | ‘लोकमत’च्या वृत्तानंतर सोलापुरातील शिवाजी चौकाने घेतला मोकळा श्वास

‘लोकमत’च्या वृत्तानंतर सोलापुरातील शिवाजी चौकाने घेतला मोकळा श्वास

googlenewsNext
ठळक मुद्देबेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम सुरूकॉर्नरला थांबणाºया रिक्षा किंवा रस्त्याच्या मध्यभागी थांबून वाहतुकीस अडथळा रिक्षाचालकांनी व अन्य वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे

सोलापूर : सकाळी ९ पासून रात्री १० वाजेपर्यंत रस्त्याच्या कडेला, मध्यभागी रिक्षा उभ्या राहणाºया रिक्षा व अन्य वाहनांवर शहर वाहतूक शाखेच्या कारवाईमुळे गुरूवारी शिवाजी चौकाने मोकळा श्वास घेतला. दिवसभरात वाहतूक शाखेचा चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. एस.टी. बसची वाहतूक सम्राट चौकाच्या दिशेने वळवण्यात आली होती. 

शहरातील प्रमुख चौकात होणाºया बेशिस्त वाहतुकीवर बुधवारी लोकमतमध्ये आॅन दि स्पॉट रिपोर्टमध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. वाहतूक शाखेने दखल घेऊन दिवसभरात एस.टी. स्टँड रोड, सम्राट चौक रोड, भागवत थिएटर रोडवर गुरूवारी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

टिळक चौकाकडे जाणाºया प्रवासी रिक्षांना हटवण्यात आले. रस्त्याला अडथळा होईल, अशा रिक्षा उभ्या राहून प्रवासी वाहतूक केली जात होती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून एस.टी. स्टँडच्या दिशेने जाणाºया रिक्षा या जागोजागी थांबून रस्त्याला अडथळा निर्माण करीत होत्या. सम्राट चौककडे जाणाºया रस्त्यावरही अशा प्रकारच्या रिक्षा या जथ्था करून प्रवाशी शोधत असतात. प्रवाशांना विचारणा करण्यासाठी भररस्त्यात थांबणाºया या रिक्षांमुळे चौकात वाहतुकीची कोंडी होत होती. 

मोटरसायकलस्वाराला शिवाजी चौकातून बाहेर पडणे तसे खूप अवघड काम होऊन बसले आहे. त्यात एस.टी. स्टँडमधून बाहेर पडणाºया एस.टी.मुळे चौकातील वाहतुकीचा खोळंबा होत होता. आगार प्रमुखाच्या कार्यालयाकडील रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एस.टी. बस जी.एम. चौकातून सोडण्यात येत होते. वाहतूक शाखेने ठेवलेल्या चोख पोलीस बंदोबस्तामुळे दिवसभराची वाहतूक सुरळीत झाली होती. 

एस.टी. आगारप्रमुख कार्यालयाकडील रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे जी.एम. चौकमार्गे होणारी वाहतूक बंद झाली आहे. पुणे, पंढरपूर मार्गावरील वाहतूक शिवाजी चौकातून सम्राट चौकाच्या दिशेने वळवण्यात आली आहे. दररोजच्या नियमित कारवाया केल्या जात आहेत. बेशिस्त रिक्षा चालकांवरही कारवाई केली जात आहे. 

वाहनचालकांनी सहकार्य करावे : पाटील
- बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध मोहीम सुरू करणार आहोत. कॉर्नरला थांबणाºया रिक्षा किंवा रस्त्याच्या मध्यभागी थांबून वाहतुकीस अडथळा करणाºया चालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. रिक्षाचालकांनी व अन्य वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी केले आहे. 

Web Title: After the 'Lokmat' report, Shivaji Chowk took a breather in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.