सोलापुरात नथीचा नखरानंतर आता सुरू झाला वैभव विभूतीचा ट्रेंड 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 03:12 PM2020-05-28T15:12:29+5:302020-05-28T17:54:38+5:30

सोशल मीडियावर प्रतिसाद : सोलापुरातील आबालवृद्धांचे फोटो झळकू लागले 

After Nathi's nails in Solapur, now the trend of Vaibhav Vibhuti has started | सोलापुरात नथीचा नखरानंतर आता सुरू झाला वैभव विभूतीचा ट्रेंड 

सोलापुरात नथीचा नखरानंतर आता सुरू झाला वैभव विभूतीचा ट्रेंड 

googlenewsNext
ठळक मुद्देवीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या ‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडला समाजातून खूप मोठा प्रतिसाद केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळी, लहान मुले, मुली व तरुण-तरुणी देखील मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागीआपल्या कपाळावर विभूती लावून त्याचा फोटो व व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावयाचे आवाहन

सोलापूर : महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात समतेचा संदेश दिला. हा संदेश देत असताना त्यांनी विभूतीचे महत्त्वही सांगितले. विभूती लावल्यामुळे मनात सकारात्मक विचार निर्माण होतो अन् हाच विचार कोरोनाशी दोन हात करताना बळ मिळवून देतो. हा धागा पकडून वीरशैव व्हिजनने सोशल मीडियावर  आता ‘वैभव विभूतीचे’ ट्रेंड सुरू केला असून, नथीचा नखरानंतर यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

सध्या महिलांमध्ये साडी चॅलेंज, नथीचा नखरा अनेक ट्रेंड अथवा चॅलेंज चालू आहेत. त्यामध्ये महिला त्या ट्रेंडप्रमाणे फोटो काढून अथवा व्हिडिओ करून सोशल मीडियावर अपलोड करीत आहेत.  त्याच पद्धतीने वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या वतीने ‘वैभव विभूतीचे’ हा ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. यामध्ये आपल्या कपाळावर विभूती लावून त्याचा फोटो व व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करावयाचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोनातून मुक्त कर अशी प्रार्थना ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्याकडे या माध्यमातून करत असल्याचे वीरशैव व्हिजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी यांनी सांगितले. 

वीरशैव व्हिजन महिला आघाडीच्या ‘वैभव विभूतीचे’ या ट्रेंडला समाजातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ महिलाच नव्हे तर पुरुष मंडळी, लहान मुले, मुली व तरुण-तरुणी देखील मोठ्या उत्साहाने या ट्रेंडमध्ये सहभागी होत असल्याचे कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते यांनी सांगितले.

हा ट्रेंड यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हिजन महिला आघाडी अध्यक्षा वर्षा काशेट्टी, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिवा माधुरी बिराजदार, सहसचिवा श्रीदेवी पाच्छापुरे-कोनापुरे, कार्याध्यक्षा रेणुका सर्जे-चाकोते, सहकार्याध्यक्षा पल्लवी हुमनाबादकर, कोषाध्यक्षा ज्योती शेटे, सहकोषाध्यक्षा राजश्री गोटे, प्रसिद्धीप्रमुख सुचित्रा बिराजदार, रेणुका धुमाळे, स्वीटी करजगीकर, कल्पना तोटद, रेश्मा निडगुंडी, पूजा साखरे, गायत्री गाढवे, गौरी खंडाळे, अमृता नकाते, पुष्पा कत्ते, दीपा तोटद, मंगल परशेट्टी, अरुंधती शेटे आदी परिश्रम घेत आहेत.

विभूतीने मानसिक स्वास्थ्य चांगले राहते 
- विभूतीचे महत्त्व व विभूती लावण्याचे कारण सांगण्याचा प्रयत्न वीरशैव व्हिजन महिला आघाडी करत आहे. विभूती लावणे हे भगवान शंकराच्याप्रती सन्मान व्यक्त करण्याचा प्रकार मानला जातो. विभूतीमधील तीनही रेषा प्रतिकात्मक मानल्या जातात. पहिली रेषा अहंकाराला दूर करण्याचे प्रतीक आहे. दुसरी रेषा अज्ञानपणा दूर करण्याचे प्रतीक आहे आणि तिसरी रेषा वाईट कर्मांना दूर करण्याचे प्रतीक आहे. विभूती लावल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विभूतीमुळे शरीरातील सात चक्र नियंत्रित करण्यास मदत होते. विभूती मस्तकावर धारण केल्याने ध्यान, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.

Web Title: After Nathi's nails in Solapur, now the trend of Vaibhav Vibhuti has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.