मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सोलापूर जिल्ह्यात आठ टँकर अन् पाच छावण्या तातडीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 08:50 PM2019-05-17T20:50:23+5:302019-05-17T20:52:52+5:30
निवासी उपजिल्हाधिकारी यांची माहिती : दोन दिवसात केली उपाययोजना
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात आठ टँकर व पाच चारा छावण्या दोन दिवसात सुरू करण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला होता. मोबाईल कॉन्फरसने झालेल्या या संवादादरम्यान काही सरपंचांकडून टँकर व छावणी सुरू करण्याची मागणी आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले होते. या उपक्रमात तहसीलदार, प्रांताधिकारी व जिल्हाधिकारीही सहभागी झाले होते.
दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई असून, पाणीच मिळत नसल्याची तक्रार यावेळी काही महिला सरपंचांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित गावात तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी संबंधित विभागास मागणी आलेल्या ठिकाणी तातडीने प्रस्ताव सादर करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार टंचाई असणाºया गावात ६ खासगी बोअरवेलही ताब्यात घेण्यात आले आहेत. या माध्यमातूनही टंचाई गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरपंचांकडून आलेल्या मागणीवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.
सोमवारपर्यंत मागणी आलेल्या गावांची पाहणी करण्यात आली. मंगळवारी मागणी आलेल्या सर्व ठिकाणी टँकर, छावण्या देण्याची व्यवस्था करण्यात आली.
पीकविमा योजनेचा अहवाल अप्राप्त
च्पीकविमा योजनेत शेतकºयांना मदत देताना दुजाभाव करण्यात आला असल्याची तक्रार एका सरपंचाने मुख्यमंत्री यांच्याकडे संवादादरम्यान केली होती. काही शेतकºयांना तीन हजार तर काही शेतकºयांना त्याच पिकासाठी तिवढ्याच क्षेत्रासाठी तीस हजारांपर्यंत मदत देण्यात आल्याची बाब मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. या प्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले होते, मात्र हा अहवाल आपल्याकडे आला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली.