नूतनीकरणानंतर सांगोला तहसील कार्यालयाचे रूपडेच पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:52+5:302021-08-17T04:27:52+5:30

१५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या तहसील कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार ...

After the renovation, Sango changed the look of the tehsil office | नूतनीकरणानंतर सांगोला तहसील कार्यालयाचे रूपडेच पालटले

नूतनीकरणानंतर सांगोला तहसील कार्यालयाचे रूपडेच पालटले

Next

१५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या तहसील कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी तहसीलदार अभिजित पाटील, नायब तहसीलदार किशोर बडवे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता अशोक मुलगीर, शाखा अभियंता मुळीक, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, पंचायत समिती सभापती राणी कोळवले, उपसभापती नारायण जगताप, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर आदी उपस्थित होते.

ब्रिटिशकालीन सांगोला तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम १८८७-८८ मध्ये दगड माती व चुन्याने झाले. संपूर्ण इमारतीवर लाकडाचा वापर करून आच्छादन केल्याने पावसाळ्यात इमारत गळत होती तर वरचेवर अंतर्गत बांधकाम जीर्ण होत चालल्यामुळे पडझड होत होती. कार्यालयाच्या दुरुस्तीबरोबर रंगरंगोटीसह नवीन फर्निचर करणे गरजेचे होते तर अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन तहसीलदार अभिजित पाटील यांनी लेखी पत्राद्वारे निधी मिळावा म्हणून आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे मागणी केली होती. तहसीलदारांच्या पत्राची दखल घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक आराखड्यातून सुमारे ३४ लाखांचा निधीची तरतूद केली होती.

फोटो ओळ ::::::::::::::::::

सांगोला तहसील कार्यालयाचे नूतनीकरणानंतर लोकार्पण करताना आमदार शहाजीबापू पाटील, तहसीलदार अभिजीत पाटील, उपसभापती नारायण जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील मोरे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, पोलीस निरीक्षक सुहास जगताप आदी.

Web Title: After the renovation, Sango changed the look of the tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.