अक्कलकोटमधील शेतकºयांच्या संघर्षानंतर ‘हिळ्ळी’साठी १ टीएमसी पाणी सोडण्याचा जलसंपदा विभागाने घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:13 PM2019-01-19T13:13:37+5:302019-01-19T13:16:24+5:30
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील संतप्त शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सीना आणि भीमा नदीतून तालुक्यासाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत १ टीएमसी पाणी ...
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील संतप्त शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सीना आणि भीमा नदीतून तालुक्यासाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. या संदर्भातील माहिती आंदोलनकर्ते आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली.
म्हेत्रे यांनी तत्पूर्वी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या कार्यालयात शेतकºयांसह तासभर ठिय्या आंदोलन केले होते.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अक्कलकोटसाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता; मात्र कर्नाटक हद्दीतील बरूर आणि हिंगणी या दोन बंधाºयात सध्या पाणी असून, अधिक पाणी सोडण्याची गरज नाही, असे जलसंपदा विभागाचे मत बनले आहे. त्यामुळे त्यांनी हिळ्ळीपर्यंत पाणी सोडण्याऐवजी औज बंधाºयापर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक शेतकºयांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे गाºहाणी मांडली. त्याचा फारसा उपयोग न झाल्याने हे शेतकरी आमदार म्हेत्रे यांच्या निवासस्थानी गेले.
आमदार म्हेत्रे यांनी तातडीने शेतकºयांसमवेत जलसंपदा विभागाच्या गुरूनानक कार्यालयाकडे धाव घेतली. अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या कार्यालयात ठिय्या मारला साळे कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते पंढरपुरात असल्याचे सांगण्यात आले. साळे यांनी पाणी सोडण्याबाबत अडचण आहे. मी आपल्याशी समक्ष बोलतो, असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या शेतकºयांनी आजच पाण्याचा निर्णय व्हायला, असा आग्रह आमदार म्हेत्रे यांच्याकडे धरला त्यामुळे हा सगळा जत्था जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती त्यांना देण्यात आली. याचवेळी आमदार म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधला.
शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात असेपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झाला पाहिजे, यावर आमदार म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, बाळासाहेब शेळके, उमेश पाटील ठाम राहिले. जिल्हाधिकाºयांनीही जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला. दरम्यान, या विभागाचे मुख्य अभियंता देशपांडे यांनी हिळ्ळी बंधारा भरेपर्यंत भीमा आणि सीना नद्यातून पाणी सोडण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना दिल्या. साळे यांनी ही माहिती आमदार म्हेत्रे यांना दूरध्वनीवरून कळविली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात सुरेश हसापुरे, अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश हिप्परगी, बाजार समितीचे संचालक श्रीशैल नरोळे, अण्णाराव याबाजी, शिवयोगी लाळसंगी, भिमाशंकर विजापूरे, कोर्सेगांवचे सरपंच पिंटू उर्फ अण्णाराव पाटील, मल्लिनाथ पाटील, महादेव पाटील, लक्ष्मण पुजारी यांच्यासह ४०० शेतकरी सहभागी होते.
याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता यांनाही निवेदन देण्यात आले. उजनी धरणातील पाणी सीना व भीमा नदीत टेल टू हेड या शासनाच्या धोरणानुसार सोडण्यात यावे, यंदा जिल्ह्यात पाऊस नाही, सोलापूर जिल्ह्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. अक्कलकोट तालुका दुष्काळी तालुका आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आली.
थेट संपर्काने सुटला तिढा
च्सीनेच्या पाण्यासाठी शेतकरी, आमदार म्हेत्रे यांच्या माध्यमातून आग्रही मागणी करीत होते. अधीक्षक अभियंता धीरज साळे कार्यालयात नसल्याने शेतकरी नाराज झाले होते. आमदार म्हेत्रे यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला. हा विषय धोरणात्मक निर्णयाचा असल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी संपर्क साधला. शेतकºयांच्या संतप्त भावना कळविल्या. समितीच्या निर्णयाची आठवण करून देताच मंत्र्यांनी चिंता करू नका, मी आदेश आत्ताच देतो, असे आश्वासित केले.