राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार-फडणवीस एकाच मंचावर! गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचे अनावरण

By Appasaheb.patil | Published: August 13, 2023 03:50 PM2023-08-13T15:50:11+5:302023-08-13T15:50:25+5:30

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार-फडणवीस एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. 

After the split of NCP, Pawar-Fadnavis on the same platform! The unveiling of the statue of Ganpatrao Deshmukh | राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार-फडणवीस एकाच मंचावर! गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचे अनावरण

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार-फडणवीस एकाच मंचावर! गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचे अनावरण

googlenewsNext

सचिन कांबळे

सांगोला : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज रविवारी सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगोल्यात एकाच मंचावर आले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार-फडणवीस एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. 

दरम्यान, स्व. गणपतराव देशमुख यांनी सांगोल्याचे सलग ११ वेळा लोक प्रतिनिधीत्व केले‌ होते. सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे रविवारी अनावरण करण्यात आले आहे. विधानभवनात आ. गणपतराव देशमुख यांचा पुतळा उभा करावा अशी मागणी होत आहे. 

या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर आले आहेत. राष्ट्रवादीच्या फूटी नंतर पवार - फडणवीस हे  एकत्र आले आहेत. यावेळी पवार फडणवीस काय बोलणार याकडेच राज्याचे लक्ष लागले आहे. रविवारी दुपारी फडणवीस हे सोलापुरात दाखल झाल्यानंतर बायरोड सांगोल्याकडे रवाना झाले होते. याचवेळी शरद पवार हेही सोलापुरातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहून सांगोल्याकडे रवाना झाले होते.

Web Title: After the split of NCP, Pawar-Fadnavis on the same platform! The unveiling of the statue of Ganpatrao Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.